संगमनेरातील सिमोल्लंघन, रावण दहन सोहळा यंदा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 04:19 PM2020-10-23T16:19:15+5:302020-10-23T16:20:11+5:30
मालपाणी उद्योग समुहाच्या अकोले रस्त्यावरील कारखाना परिसरात असलेल्या शमी वृक्षाचे पूजन करण्यासाठी संगमनेरकर विजयादशमीलामोठी गर्दी करतात. येथील सिमोल्लंघनाला शतकांची परंपरा आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिमोल्लंघन व रावण दहन सोहळा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी दिली.
संगमनेर : मालपाणी उद्योग समुहाच्या अकोले रस्त्यावरील कारखाना परिसरात असलेल्या शमी वृक्षाचे पूजन करण्यासाठी संगमनेरकर विजयादशमीलामोठी गर्दी करतात. येथील सिमोल्लंघनाला शतकांची परंपरा आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिमोल्लंघन व रावण दहन सोहळा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी दिली.
प्रशासनाच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून विजयादशमीच्या निमित्ताने येथे सत्यनारायण महापूजा होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या सूचनेनुसार यंदाचा विजयादशमी सिमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला आहे. संगमनेरकरांनी विजयादशमीच्या दिवशी घरातच राहुन कोविडच्या पराभवासाठी सूरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ द्यावे, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.