स्वच्छता अभियान राबवून कौन्सिल हॉलमध्ये गायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:51+5:302021-06-30T04:14:51+5:30

महापालिकेची स्थापना ३० जून २००३ रोजी झाली होती. बुधवारी महापालिकेचा १८ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त झालेल्या ...

Singing in the council hall with a cleaning campaign | स्वच्छता अभियान राबवून कौन्सिल हॉलमध्ये गायन

स्वच्छता अभियान राबवून कौन्सिल हॉलमध्ये गायन

महापालिकेची स्थापना ३० जून २००३ रोजी झाली होती. बुधवारी महापालिकेचा १८ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त झालेल्या स्वच्छता अभियानात स्थायी समिती सभापती अविनाश घुले, इतिहास तज्ज्ञ भूषण देशमुख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, पंकज मेहेर, शिल्पकार प्रमोद कांबळे, गायक पवन नाईक, अमोल बासकर, भरत बागरेजा, बालाजी वल्लाळ, सतीश गुगळे, अंबादास गाजुल, योगेश हराळे, संजय कुलकर्णी, संतोष दाणे, संजय दळवी, अमर अग्रवाल, श्रज्स शित्रे आदी उपस्थित होते.

यावेळी सभापती घुले म्हणाले, महापालिकेचा कौन्सिल हॉल ऐतिहासिक आहे. परंतु आगीत भस्मसात झाल्यापासून त्याकडे दुर्लक्ष होत गेले. आता या हॉलच्या नूतनीकरणासाठी विविध क्षेत्रातील कलाकार पुढाकार घेत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून तसेच नियोजन समितीच्या माध्यमातून या हॉलच्या नूतनीकरणासाठी विशेष निधीची मागणी करण्यात येईल. महापालिकेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व इतिहासप्रेमी, साहित्यिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबविले. त्यामुळे पुढील काळात या हॉलला नवसंजीवनी मिळेल.

रफिक मुन्शी म्हणाले, महापालिकेचा कौन्सिल हॉल अनेक नव्या-जुन्या कलाकारांसाठी यशाचे व्यासपीठ ठरले आहे. या हॉलमध्ये पूर्वी अनेक दिग्गजांच्या मैफिली, समारंभ, व्याख्याने झाली. या हॉलचे पुननिर्माण व्हावे.

शहरातील कलाकारांच्यावतीने आगीत भस्मसात झालेल्या हॉलची स्वच्छता करून या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम करून त्यादृष्टीने एक पाऊल टाकले आहे. यापुढेही अशाच उपक्रमांद्वारे हॉलच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही करण्यात आली.

चित्रकार प्रमोद कांबळे म्हणाले, नगरचा कौन्सिल हॉल हा नगरकरांसाठी मोठा अमूल्य ठेवा आहे. या हॉलसाठी कलाकारांबरोबरच नगरकरांनीही पुढे येण्याची गरज आहे. या स्वच्छता अभियानानंतर गायक पवन नाईक व सहकाऱ्यांनी गीते सादर करून कौन्सिल हॉलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रमोद कांबळे यांनी राष्ट्रपुरुषांची चित्रे रेखाटली. या स्वच्छता अभियानासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले.

--------

फोटो - २९ महापालिका हॉल

महापालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील इतिहासप्रेमी व सामाजिक संस्था यांनी जुन्या मनपातील कौन्सिल हॉलमध्ये स्वच्छता अभियान राबविले.

Web Title: Singing in the council hall with a cleaning campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.