‘साहेब..., कोंबड्या पुरात वाहून गेल्या, घर चालवू कसे?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:22 AM2021-09-03T04:22:23+5:302021-09-03T04:22:23+5:30
अहमदनगर : विहीर खोदताना पतीला आलेल्या अपंगत्वामुळे कोंबड्यांची अंडी विकून कसेबसे घर चालत होते. पण, पुराच्या पाण्यात सगळ्या कोंबड्या ...
अहमदनगर : विहीर खोदताना पतीला आलेल्या अपंगत्वामुळे कोंबड्यांची अंडी विकून कसेबसे घर चालत होते. पण, पुराच्या पाण्यात सगळ्या कोंबड्या वाहून गेल्या. आता घर चालवू कसे?, असे सांगताना महिलेला रडू कोसळले. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी कोंबड्या विकत घेण्यासाठी दहा हजारांची वैयक्तिक मदत लगेच दिली. या मदतीमुळे त्या महिलेच्या संसाराला हातभार लागला.
माजी आमदार कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, शिरापूर, करडवाडी, घाटसिरस, देवराई, त्रिभुवनवाडी, चिचोंडी शिराळ गावातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची गुरुवारी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पुरात वाहून गेलेले शेततळे दाखविले. तसेच जनावरे, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्याचे काहींनी सांगितले. यावेळी जि. प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, पंचायत समितीचे सदस्य एकनाथ आटकर, संचालक बाबा खर्से, धिरज मैड, रवी भापसे, बाळासाहेब लवांडे, भाऊसाहेब लवांडे, अनिल पालवे, दादासाहेब चोथे, महेंद्र शिरसाठ, अर्जुन बुधवंत, बापू कुटे, संतोष टापरे, गोरख कारखिले, शिवाजी कारखिले, अंबादास कारखिले, कृषी सहाय्यक राठोड आदी उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांत पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीबरोबरच काहींच्या कोंबड्या वाहून गेल्या.
....
जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी
माजी आमदार कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्याचा दौरा करून दुपारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेतली यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचवा. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, तातडीने मदत द्यावी, अशी मागणी कर्डिले यांनी केली.
....
सूचना फोटो: ०२ कर्डिले नावाने आहे.