बारागाव नांदूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:47+5:302021-09-23T04:23:47+5:30
याप्रसंगी सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गाडे, सोमा गाडे, विलास जाधव, शांताराम गाडे, विश्वास पवार, योगेश गाडे, रफिक इनामदार, नवाज ...
याप्रसंगी सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गाडे, सोमा गाडे, विलास जाधव, शांताराम गाडे, विश्वास पवार, योगेश गाडे, रफिक इनामदार, नवाज देशमुख, रियाज देशमुख, रियाज इनामदार, वसंत गाडे, बाळासाहेब गाडे यांनी गुन्हेगारीची सविस्तर माहिती दिली.
ग्रामस्थांनी पोलीस कर्मचारी गावात फक्त गुन्हेगारांना भेटतात, पोलीस कर्मचारी व गुन्हेगारांचे हितसंबंध असल्याने सर्वसामान्य तक्रार देण्यास घाबरतात, वाहने चोरीला गेल्यानंतर तक्रार केल्यास मुळा धरणाच्या पाण्यामध्ये दुचाक्या फेकून दिल्या जातात, चोरट्यांकडून समूह तयार करून हल्ले केले जातात, आदी समस्या मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील अनेक गुन्हेगार हे बारागाव नांदूर गावाच्या मुळा धरण व वन विभागाच्या हद्दीमध्ये बिनदिक्कत अतिक्रमण करून राहत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
याप्रसंगी प्रभाकर गाडे, भाऊसाहेब कोहकडे, सरपंच प्रतिनिधी निवृत्ती देशमुख, मुळा खोरे संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ गाडे, दिलीप कोहकडे, हमीद इनामदार, डॉ. ज्ञानेश्वर आघाव, राजेंद्र गाडे, रहेमान इनामदार, अनिल कदम, गोवर्धन गाडे आंदोलनात सहभागी झाले होते.