श्रीगोंदा तालुक्यात खुनी, दरोडेखोरांची टोळी जेरबंद : सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:04 PM2018-05-17T19:04:58+5:302018-05-17T19:05:35+5:30
श्रीगोंदा, बेलवंडी, सुपा, पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, खून, दरोडा, बलात्कार असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली़ बुधवारी (दि़ १६) रात्री उशीरा बेलवंडी फाटा (ता़ श्रीगोंदा) येथे दरोड्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने झडप टाकून ही टोळी जेरबंद केली़
अहमदनगर : श्रीगोंदा, बेलवंडी, सुपा, पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, खून, दरोडा, बलात्कार असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली़ बुधवारी (दि़ १६) रात्री उशीरा बेलवंडी फाटा (ता़ श्रीगोंदा) येथे दरोड्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने झडप टाकून ही टोळी जेरबंद केली़
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबऱ्यामार्फत ही टोळी बेलवंडी फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पवार यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, कैलास देशमाने, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी बुधवारी रात्री बेलवंडी फाटा (ता़ श्रीगोंदा) येथे सापळा रचला़ नगर-दौंड रस्त्यावरुन ही टोळी दरोड्याच्या तयारीने बेलवंडी फाटा येथे आली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर छापा टाकला़ त्यावेळी त्यांनी तेथून पळ काढला़ त्यांचा पाठलाग करुन पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुरे, कोयता, लाकडी दांडके, दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ विविध गुन्ह्यांमध्ये हे आरोपी पोलिसांना हवे होते़ त्यांच्यावर चोरी, घरफोडी, खून, दरोडा, बलात्कार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़
हे आहेत सराईत गुन्हेगार
दत्ता उर्फ दत्तात्रय अरुण भोसले (वय २७, रा़ पिंपळगाव पिसा, ता़ श्रीगोंदा), कुक्या उर्फ सुलदास उबºया काळे (वय २५), सगड्या उंबºया काळे (वय ३८) अक्षय उबºया काळे (वय २१), कोक्या उर्फ कुलदास उबºया काळे (वय २३), मिथून उबºया काळे (वय १९, सर्वजण रा़ सुरेगाव, ता़ श्रीगोंदा) या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून श्रीगोंदा, बेलवंडी, सुपा, पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील चोºया, दरोडे आणि इतर गुन्ह्यांची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे़