सहा बिबट्यांचा गोठ्यावर हल्ला; महिला बचावली, दोन शेळ्यांचा पाडला फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 03:36 PM2021-01-09T15:36:16+5:302021-01-09T15:37:20+5:30
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील एका वस्तीवरील जनावरांच्या बंदिस्त गोठ्यावर शुक्रवारी मध्यरात्री सहा बिबट्यांनी मिळून हल्ला केला. यावेळी त्यांनी दोन शेळ्यांचा फडशा पाडला. यावेळी आरडाओरडा करणाऱ्या महिलेवर ही हल्ला केला. परंतू ही महिला थोडक्यात बचावली आहे.
आश्वी : संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील एका वस्तीवरील जनावरांच्या बंदिस्त गोठ्यावर शुक्रवारी मध्यरात्री सहा बिबट्यांनी मिळून हल्ला केला. यावेळी त्यांनी दोन शेळ्यांचा फडशा पाडला. यावेळी आरडाओरडा करणाऱ्या महिलेवर ही हल्ला केला. परंतू ही महिला थोडक्यात बचावली आहे.
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द शिवारातील गट नंबर १४३ मधील नानाभाऊ वाघमारे यांचा वस्तीवरील बंदिस्त जनावरांचा गोठ्यावर शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास वाघमारे वस्तीवर सहा बिबटे शिकारीच्या शोधात दाखल झाले होते. त्यामुळे शेळ्यानी मोठ्याने ओरडण्यास सुरवात केली. त्यामुळे नेमके काय झाले हे पाहण्यासाठी वाघमारे कुटुंबिये बाहेर आले असता दोन बिबटे गेटसमोर, दोन बिबट्ये मागील बाजूला तर दोन बिबट्ये थेट आंब्याच्या झाडाचा आधार घेऊन बंदिस्त गोठ्यात शिरलेले दिसले.
या बिबट्यानी दोन शेळ्या ठार करत एक शेळी उचलून गोठ्याबाहेर नेली. यावेळी बिबट्यांना हुसकावण्यासाठी वाघमारे कुटुंबिय सरसावले असता बिबट्याने बबई वाघमारे या महिलेवर हल्ला केला. परंतू दैव बलवत्तर म्हणून महिलेच्या साडीला बिबट्याचा पंज्जा लागल्याने ती बचावली.
बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यासह अधिकाऱ्यांचा फौजफाटा रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास वाघमारे यांच्या वस्तीवर दाखल झाला असून अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.