हायप्रोफाईल लग्नसोहळ्यातून लांबविले सहा लाखांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:51 PM2019-11-24T13:51:52+5:302019-11-24T13:52:10+5:30
नगर-औरंगाबाद रोडवरील एनआऱ लॉन या मंगलकार्यालयातील लग्नसोहळ्यातून चोरट्यांनी तब्बल सहा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
अहमदनगर: लग्नसराई सुरू होताच अंगावर खाजेचे औषध टाकून चो-या करणाºया परप्रांतीय टोळ्या नगर शहर व परिसरात पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी सात वाजता नगर-औरंगाबाद रोडवरील एनआऱ लॉन या मंगलकार्यालयातील लग्नसोहळ्यातून चोरट्यांनी तब्बल सहा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या चोरीत लहान मुलाचा वापर झाल्याचे सीसीटिव्ही फुटेजमधून समोर आले आहे.
एनआर लॉन येथे शनिवारी सायंकाळी श्रीरामपूर येथील सराफ व्यवसायिक असलेल्या नागरे कुटुंबियांचा विवाह सोहळा होता. या सोहळ्यातील झगमगाट पाहून चोरट्यांनी चोरट्यांनी हे मंगलकार्यालय लक्ष्य केले. चोरीसाठी एका लहान मुलाला वेटरचे कपडे घालून आतमध्ये पाठविले. या मुलाने लग्नसोहळ्यातील जयश्री नागरे यांना हेरून त्यांच्या अंगावर खाजेचे औषध टाकले़ जयश्री यांचे लक्ष्य विचलित होताच मुलाने त्यांची पर्स चोरून नेली़. या पर्समध्ये ५ लाख ९८ हजार रुपयांचे दागिने होते. या चोरीच्या घटनेनंतर मंगल कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज तपासले तेंव्हा चोरी करणारा मुलगा आत येताने व नंतर पिशवी बाहेर घेऊन जाताने दिसत आहे. याप्रकरणी जयश्री यांचा मुलगा अजिंक्य दिलीप नागरे (वय २६ रा़ श्रीरामपूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक मोहन बोरसे, उपनिरिक्षक पवन सुपनर यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटिव्ही फुटेज तपासले व परिसरात चोरट्यांचा शोध सुरू केला. याप्रकरणी हेड कॉस्टेबल थोरवे हे पुढील तपास करत आहेत़.