सहा मिनिटांची वॉक टेस्ट फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:14+5:302021-04-22T04:20:14+5:30

हाताच्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर, पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसेच ठेवून घरातल्या ...

A six-minute walk test is beneficial | सहा मिनिटांची वॉक टेस्ट फायदेशीर

सहा मिनिटांची वॉक टेस्ट फायदेशीर

हाताच्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी.

नंतर, पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसेच ठेवून घरातल्या घरात घड्याळ लावून सहा मिनिटे स्थिर गतीने वॉक करावा. नंतर, पुन्हा ऑक्सिमीटरवरील नोंद घ्यावी. सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी झाल्यास अथवा चालणे सुरू करण्यापूर्वी असलेल्या पातळीपेक्षा ही पातळी तीनपेक्षा अधिकने कमी झाली किंवा चालल्यानंतर धाप येणे, दम लागल्यासारखे होत असेल, तर तातडीने डॉक्टरांना दाखवावे.

----------

...तर काळजीचे काही कारण नाही

सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल तर अगदी उत्तम. तुमची तब्येत एकदम चांगली आहे. जर रक्तातील ऑक्सिजनची पातळी केवळ १ ते २ टक्क्यांनी कमी होत असेल, तरीही काळजी करण्याचे कारण नाही. यामध्ये काही बदल होत नाही, हे पाहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ही चाचणी करावी.

इतर महत्त्वपूर्ण मुद्दे

६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालूनदेखील ही चाचणी करू शकतात. चाचणी करताना शक्यतो एका व्यक्तीला सोबत बसवणे चांगले, जेणेकरून दम लागला तर ती मदत करू शकेल. बसल्याजागी ज्यांना दम, धाप लागत असेल, त्यांनी ही चाचणी करू नये.

----------

सहा मिनिटांची वॉक टेस्ट करणे फायदेशीर आहे. त्यामुळे निदान होऊन त्रास जाणवलेल्या व्यक्तींची इतर टेस्ट व त्यानंतर उपचार करण्यास मदत होते. योग्य पद्धतीने काळजी घेऊन वॉक टेस्ट करावी. ज्येष्ठ नागरिकांनी टेस्ट करताना काळजी घ्यावी.

डॉ. सीमा घोगरे, नोडल ऑफिसर, डीसीएचसी, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय, संगमनेर

---------

Web Title: A six-minute walk test is beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.