विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्यास सहा महिने सश्रम कारावास
By शेखर पानसरे | Published: March 9, 2023 07:47 PM2023-03-09T19:47:06+5:302023-03-09T19:47:40+5:30
विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्यास सहा महिन्याचा सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : (अहमदनगर ) विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्यास सहा महिन्याचा सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी गुरूवारी (दि. ९) हा निकाल दिला.
मुद्दसर जाफर शेख असे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध सात वर्षांपूर्वी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. विद्यार्थिनी महाविद्यालयात जात असताना शेख वेळोवेळी तिचा पाठलाग करायचा. त्याला समजावून सांगूनही तो ऐकत नव्हता. दुचाकीने पाठलाग करत त्याने विद्यार्थिनी जात असलेल्या दुचाकीला त्याची दुचाकी अडवी लावत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तिच्या घरासमोर तो आला असता विद्यार्थिनीच्या वडिलांनी त्याला विचारले त्यावेळी त्याने त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्यानंतर शेख विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"