अहमदनगर जिल्ह्यात आणखी सहा कोरोनाबाधितांना रग्णालयातून सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:17 PM2020-05-06T19:17:28+5:302020-05-06T19:17:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्याने पुन्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे. मंगळवारी तीन व आज (बुधवारी) सहा कोरोनाबाधित रूग्णांना त्यांच्या १४ दिवसांनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ ८ जण रूग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी डिस्चार्ज झालेल्यांत जामखेडचे दोन व संगमनेरच्या चौघांचा समावेश आहे. दरम्यान, ४४ पैकी ३४ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

Six more corona patients discharged from hospital in Ahmednagar district | अहमदनगर जिल्ह्यात आणखी सहा कोरोनाबाधितांना रग्णालयातून सुट्टी

अहमदनगर जिल्ह्यात आणखी सहा कोरोनाबाधितांना रग्णालयातून सुट्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्याने पुन्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे. मंगळवारी तीन व आज (बुधवारी) सहा कोरोनाबाधित रूग्णांना त्यांच्या १४ दिवसांनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ ८ जण रूग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी डिस्चार्ज झालेल्यांत जामखेडचे दोन व संगमनेरच्या चौघांचा समावेश आहे. दरम्यान, ४४ पैकी ३४ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.
कोरोनाबाधित असलेल्या जामखेड येथील दोन आणि संगमनेर येथील चौघा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी या ६ रुग्णांची बूथ हॉस्पिटलमधून तपासणीनंतर घरी रवानगी करण्यात आली. यावेळी बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स, तसेच इतर आरोग्य कर्मचाºयांनी स्वागत करुन त्यांना निरोप दिला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता ३४ झाली आहे.
दरम्यान, या रुग्णावर उपचार करणाºया बूथ हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे आणि त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधासाठी अहोरात्र राबणाºया आरोग्य यंत्रणेचे आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या यंत्रणांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतूक केले. नागरिकांनी लॉकडाऊन काळात दाखविलेल्या संयमाचे आणि सहकार्याचे सर्व मंत्रीमहोदय आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आभार मानले आहेत. आगामी काळातही सर्वांनी काळजी घेण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. 
एकूण ४४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी आता ८ रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यापैकी १६ व्यक्तींचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.
संगमनेर येथे ४ नेपाळी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यांचे पुढील दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, जामखेड येथील कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र जामखेड हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याने त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १६४८ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १५५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
--
 

Web Title: Six more corona patients discharged from hospital in Ahmednagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.