सकाळी सहा....सायंकाळी बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, माळीवाड्यात पाच जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 06:48 PM2020-06-04T18:48:41+5:302020-06-04T18:48:49+5:30
अहमदनगर : सकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सायंकाळी जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर पडली. जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथील कोविड-१९ टेस्ट लॅबच्या अहवालात १२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी आलेल्या अहवालात ०६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. आज दिवसभरात १८ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत.

नगर शहरात आणखी सात रुग्णांची भर. माळीवाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली. यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे कुटुंब कोरोना बाधित आढळले आहे. यात ०४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय, मार्केट यार्ड येथील ३७ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे. लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी बाधित आलेल्या रुग्णाचे वडील ते वडील आहेत.
शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. बाधिताची पत्नीचाही अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. भांडूप (मुंबई) येथून शेवगाव येथे आलेल्या ५५ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली सेक्टर -०४ (मुंबई) येथून पाथर्डी येथे आलेला ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १९५ एवढी झाली आहे.