एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:33+5:302021-02-27T04:27:33+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात शुक्रवारी सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर १८६ नव्या कोरोना बाधितांची रुग्ण संख्येत भर पडली आहे. ...

Six people died in a single day | एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू

एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू

अहमदनगर : जिल्ह्यात शुक्रवारी सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर १८६ नव्या कोरोना बाधितांची रुग्ण संख्येत भर पडली आहे. १७१ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर १ हजार १५ जणांवर उपचार सुरु आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११६ आणि अँटीजेन चाचणीत १३ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३०, नगर ग्रामीण २, नेवासा १, पारनेर १, पाथर्डी ३, संगमनेर २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३७, अकोले २, जामखेड १, कर्जत १, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ३, पारनेर १५, पाथर्डी ३, राहाता १२, राहुरी १, संगमनेर २८, शेवगाव २, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ३ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत शुक्रवारी १३ जण बाधित आढळून आले. नगर शहर ३, जामखेड १, पाथर्डी १, राहाता २, राहुरी ४, श्रीगोंदा १, श्रीरामपूर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

शुक्रवारी १७१ जणांना घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार २८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१४ टक्के इतके झाले आहे.

गुरुवारी एकूण मृत्यू संख्या ११३४ इतकी होती, ती शुक्रवारी एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यू पावलेल्यांची सख्या ११४० वर पोहोचल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

.............

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या :७३२८२

उपचार सुरू असलेले रूग्ण : १०१५

मृत्यू : ११४०

एकूण रूग्ण संख्या : ७५४३७

Web Title: Six people died in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.