साई मंदिर परिसरात सहा संशयित महिला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 03:42 PM2018-10-17T15:42:33+5:302018-10-17T15:42:37+5:30

साई बाबांच्या दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या साईभक्तांना लुटण्याच्या उद्देशाने वावरणा-या सहा परप्रांतीय संशयित महिलांना बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.

Six suspected women are in the Sai Temple area | साई मंदिर परिसरात सहा संशयित महिला ताब्यात

साई मंदिर परिसरात सहा संशयित महिला ताब्यात

शिर्डी : साई बाबांच्या दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या साईभक्तांना लुटण्याच्या उद्देशाने वावरणा-या सहा परप्रांतीय संशयित महिलांना बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, शिर्डीत सध्या साई समाधी शताब्दी महोत्सवाचा सांगता समारंभ धुमधडाक्यात सुरू आहे. शताब्दी वर्षाच्या सांगतेला तीन दिवस उरलेले असताना साईभक्त मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत. साई मंदिरात दर्शनासाठी येणाºयांचे पैसे व दागिन्यांची चोरी करण्याच्या उद्देशाने काही महिला व पुरूष भक्त बनून फिरत होते. दुपारच्या सुमारास मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी गुरूस्थान व मंदिर परिसरातूनआंध्रप्रदेश व तामिळनाडू राज्यातील सहा परप्रांतीय महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शिर्डीत सध्या साई समाधी शताब्दी महोत्सव सुरू आहे. या निमित्ताने देश-विदेशातून लाखो साईभक्त येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील १९ आॅक्टोबरला येणार आहेत. तीन दिवसीय सांगता सोहळ्यासाठी होणाºया गर्दीचा फायदा घेत लुटारू महिलांची टोळी सक्रीय झाली आहे.

Web Title: Six suspected women are in the Sai Temple area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.