दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:19 AM2021-02-07T04:19:57+5:302021-02-07T04:19:57+5:30

------------------ विवरणपत्र दाखल करण्याचे आस्थापनांना आवाहन अहमदनगर: जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेमध्ये, कार्यालयामध्ये कार्यरत मनुष्यबळाची ...

Skill training opportunities for persons with disabilities | दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षणाची संधी

दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षणाची संधी

------------------

विवरणपत्र दाखल करण्याचे आस्थापनांना आवाहन

अहमदनगर: जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेमध्ये, कार्यालयामध्ये कार्यरत मनुष्यबळाची माहिती प्रत्येक तिमाही संपताच विवरणपत्र ३१ जानेवारीअखेर सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. शासनाच्या प्रचलीत नियमानुसार उद्योजकांना एक महिना अतिरिक्त ग्रेस परेड म्हणून २८ फेब्रुवारी २०२१ पूर्वी ऑनलाइन पाठविता येऊ शकते. कार्यरत मनुष्यबळाचे माहे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तिमाहीचे त्रैमासिक विवरणपत्र कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र शासन या विभागाच्या या वेबपोर्टलवर ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आकाशवाणी केंद्राजवळ, सावेडी, अहमदनगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------------

भरती मेळाव्याचे १० फेब्रुवारीला आयोजन

अहमदनगर: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर येथे शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आयोजित केलेला आहे. सदर भरती मेळाव्याकरिता आरेखक, सिव्हिल ड्राफ्ट्रसमन, अभियांत्रिकी सहायक, आर्किटेक्चरल असिस्टंट, अनुरेखक, सर्वेअर, वायरमन, मेकॅनिक मो.व्हे. पाईप फिटर, प्लंबर, इलेक्ट्रीशियन पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, फिटर, मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्टर), गार्डनर (माळी) इ. ट्रेडच्या इच्छुक आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळावा होणार आहे. हा मेळावा १० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था) यांनी केले आहे.

----------------

Web Title: Skill training opportunities for persons with disabilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.