संगमनेरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल
By शेखर पानसरे | Published: May 16, 2023 04:38 PM2023-05-16T16:38:02+5:302023-05-16T16:38:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई करत १ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे ४५० किलो ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई करत १ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे ४५० किलो गोमांस जप्त केले. मंगळवारी (दि. १६) पहाटे शहरातील जमजम कॉलनी येथील पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकाविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजीक रज्जाक शेख (रा. संगमनेर) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉस्टेबल महादू किसन खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल असलेला शेख पसार आहे. जमजम कॉलनी परिसरात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याबाबत माहिती मिळाल्याने शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासमवेत सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस कॉस्टेबल खाडे आदी कर्मचारी तेथे पोहोचले.
एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू होती. पोलिस आल्याचे पाहून राजीक शेख हा पळून गेला. पोलिसांनी गोमांस जप्त करत ते नष्ट केले. गुन्हा दाखल झाला असून पोलिस नाईक गजानन गायकवाड अधिक तपास करीत आहेत.