झोपलेल्या व्यक्तीच्या शर्टात घुसला साप : जिल्हा रुग्णालयातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:05 PM2019-06-23T16:05:39+5:302019-06-23T16:05:47+5:30

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात झोपलेल्या एका व्यक्तीच्या शर्टमध्ये साप आढळल्याची घटना १५ जूनच्या पहाटे घडली़

Sleeping person shifts to the shirt: District Hospital incident | झोपलेल्या व्यक्तीच्या शर्टात घुसला साप : जिल्हा रुग्णालयातील घटना

झोपलेल्या व्यक्तीच्या शर्टात घुसला साप : जिल्हा रुग्णालयातील घटना

अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात झोपलेल्या एका व्यक्तीच्या शर्टमध्ये साप आढळल्याची घटना १५ जूनच्या पहाटे घडली़ या घटनेचा व्हिडिओ शनिवारी सर्वत्र व्हायरल झाला़ अतिदक्षता विभागाचा दरवाजा नेहमी बंद असतानाही हा साप आतमध्ये गेला कसा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे़
मागील शनिवारी (दि़१५) पहाटे साडेतीन वाजता सर्पमित्र आकाश गोसावी यांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात एका शेतकऱ्याच्या शर्टमध्ये साप घुसल्याची माहिती फोन वरुन मिळाली़ त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय गाठून त्या शेतकºयाच्या शर्टमधून साप बाहेर काढला़ या घटनेचा सर्पमित्र गोसावी यांनी व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड केला़ शनिवारी व्हॉटस्अ‍ॅपवरुन हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला़ त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले़ समाज माध्यमावर जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर टीकाही होऊ लागली़
जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचा दरवाजा नेहमी बंद असतो, मग हा साप आतमध्ये गेला कसा, तो आतमध्ये जाताना कोणीच पाहिला कसा नाही आणि थेट त्या शेतकºयाच्या शर्टमध्ये घुसतानाच कुणी पाहिला, साप शर्टमध्ये घुसल्यानंतरही त्या व्यक्तीला जाग कशी आली नाही, असे प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले़ ज्या व्यक्तीने सर्पमित्र गोसावी यांना फोनवरुन माहिती दिली, तो व्यक्ती कोण ही माहितीही समजू शकली नाही़
दरम्यान या घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ प्रदीप मुरंबीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेबाबत मला काहीही माहिती नाही़ त्या काळात मी सुट्टीवर होतो, असे सांगितले़ इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनाही या घटनेबाबत काही माहिती नव्हती़

‘त्या’ कर्मचा-यांवर कारवाई करणार का?
अतिदक्षता विभागात शर्टमध्ये साप घुसलेला व्यक्ती एका रुग्णाचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते़ पण त्या व्यक्तीला अतिदक्षता विभागात खाली फरशीवर झोपण्याची परवानगी कशी दिली? यातून काही दुर्दैवी घटनाही होऊ शकते़ त्यामुळे अतिदक्षता विभागात नातेवाईकांना झोपण्यास परवानगी देणाºया आणि साप आत येईपर्यंत दुर्लक्ष करणाºया कर्मचाºयांवर जिल्हा शल्य चिकित्सक काय कारवाई करणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे़

मला एका अज्ञात व्यक्तीने जिल्हा रुग्णालयात साप निघाल्याची माहिती दिली़ मीही त्या व्यक्तीला नाव विचारले नाही़ त्या सर्व घटनेचा मी व्हिडिओ तयार केला आहे़ तो साप बिनविषारी आहे़ हे साप नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोठेही आढळतात़ साप पकडला त्यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या नर्स होत्या़ त्यांनी याबाबत डॉक्टरांना माहिती दिली की नाही, हे मला माहिती नाही़ पण मी तो साप पकडून जंगलात मुक्त केला आहे़ -आकाश गोसावी, सर्पमित्र

Web Title: Sleeping person shifts to the shirt: District Hospital incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.