राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेट्रोल पंपाला चपलांचा हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:56+5:302021-01-13T04:49:56+5:30

अहमदनगर : पेट्रोल, डिझेल आणि गॉस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नगर येथील इप्मिरिअल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ...

Slipper necklace at petrol pump from NCP | राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेट्रोल पंपाला चपलांचा हार

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेट्रोल पंपाला चपलांचा हार

अहमदनगर : पेट्रोल, डिझेल आणि गॉस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नगर येथील इप्मिरिअल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी पेट्रोल पंपावरील मशिनला चपलांचा हार घालण्यात आला.

आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, महिला अध्यक्ष रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे, विद्यार्थी अध्यक्ष गजानन भांडवलकर, वैभव ढाकणे, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, साधना बोरुडे, नगरसेवक समद खान, अमोल गाडे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निम्म्यापेक्षा कमी झाल्या असताना पेट्रोलचे भाव निम्म्यावर येणे अपेक्षित होते; परंतु केंद्र सरकारने ५० टक्क्यांपेक्षा अधिक कर लावून स्वस्त झालेला पेट्रोल-डिझेलचा भाव देशातील जनतेला मिळू दिला नाही. कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झालेली असताना देशात यावर लावलेले कर कमी करून दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने काहीही केलेले नाही. स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरच्या किमती ४०० रुपयांवरून ८०० रुपयांपर्यंत वाढलेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

----------

फोटो- ११ एनसीपी

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपावरील मशीनला चपलांचा हार घालून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. समवेत आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी.

Web Title: Slipper necklace at petrol pump from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.