अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी 'बचाव' चा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:42+5:302021-02-23T04:31:42+5:30
अकोले : तालुक्यातील अगस्ती साखर कारखान्यासह सहकारी संस्था वाचविण्यासाठी एकवटलेल्या माजी मंत्री मधुकर पिचड विरोधकांनी आता अकोले तालुका एज्युकेशन ...
अकोले : तालुक्यातील अगस्ती साखर कारखान्यासह सहकारी संस्था वाचविण्यासाठी एकवटलेल्या माजी मंत्री मधुकर पिचड विरोधकांनी आता अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी 'बचाव' चा नारा दिला आहे. संस्थेचे तीन विश्वस्त यांच्यासह विद्यमान आमदार व प्रमुख नेत्यांची सहविचार सभा मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केली आहे.
याबाबतचे पत्र गावोगावी जनरल बॉडी सभासदांना पोहोच करण्यात आले आहे. डॉ. आ. किरण लहामटे, संस्थाचे विश्वस्त डॉ. बी. जी. बंगाळ, दशरथ सावंत व मीनानाथ पांडे, उपाध्यक्ष अशोक भांगरे, मधुकर नवले यांच्या उपस्थितीत ही सभा होत आहे.
१९७२ ला अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. तत्कालीन आमदार दिवंगत यशवंतराव भांगरे, कालकथित दादासाहेब रुपवते, दिवंगत भाऊसाहेब हांडे, बुवासाहेब नवले, लालचंद शहा यांच्यासह विश्वस्त डॉ. बी. जी. बंगाळ यांच्या पुढाकाराने संस्था नावारूपाला आली. श्रमदान, विडी कामगार, शेतकरी व पालामोड योजना या माध्यमातून आर्थिक हातभार लागत संस्था इमारती उभ्या राहिल्या आहेत.
बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मीनानाथ पांडे, वकील किसन हांडे, शांताराम गजे, कोंडाजी ढोन्नर, पाटीलबुवा सावंत, नितीन जोशी यांनी केले आहे.
...
कारभारात अनियमितता
सध्या माजी मंत्री पिचड गटाचे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेवर वर्चस्व आहे. विद्यमान कार्यकारिणी एक तपाहून अधिक काळ कार्यरत आहेत. दोनच सदस्य संस्था कारभार पाहत असून कार्यकारिणीच्या व विश्वस्त मंडळाच्या बैठका होत नसल्याचा आरोप केला जात आहे. कारभारात अनियमितता असून बेकायदेशीर निर्णय घेतले जात आहेत. घटनेतील तरतुदीनुसार संस्थेची जनरल बॉडी बैठक बोलावण्यासाठी ही सहविचार सभा आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.
...