विभागप्रमुखाअभावी स्मार्ट एलईडी प्रकल्प काळवंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:20 AM2020-12-22T04:20:09+5:302020-12-22T04:20:09+5:30

अहमदनगर : महापालिकेत विभागप्रमुखाचे पद रिक्त झाल्यास त्याजागी नियुक्ती मिळविण्यासाठी अभियंत्यांमध्ये स्पर्धा लागते. मात्र, विद्युत विभागाचा प्रमुख म्हणून हजर ...

Smart LED project blacked out due to lack of department head | विभागप्रमुखाअभावी स्मार्ट एलईडी प्रकल्प काळवंडला

विभागप्रमुखाअभावी स्मार्ट एलईडी प्रकल्प काळवंडला

अहमदनगर : महापालिकेत विभागप्रमुखाचे पद रिक्त झाल्यास त्याजागी नियुक्ती मिळविण्यासाठी अभियंत्यांमध्ये स्पर्धा लागते. मात्र, विद्युत विभागाचा प्रमुख म्हणून हजर होण्याचा आयुक्तांनी आदेश देऊनही कुणी हजर होईना. हे पद रिक्त असल्याने महापालिकेच्या स्मार्ट एलईडी प्रकल्पाची एकमेव निविदा संगणकातच अडकली आहे. विभागप्रमुख नसल्याने मोठा प्रकल्प रखडण्याची ही पहिलीच घटना आहे.

शहरातील पथदिव्यांच्या वीज बिलासह दुरुस्तीचा खर्च महापालिकेला पेलावत नाही. वीज बिलाचा खर्च कमी करून नवीन एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर स्मार्ट एलईडी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला; परंतु पूर्णवेळ विभागप्रमुख नसल्याने हा प्रकल्प कागदावरच होता. प्रकल्प विभागाचे उपिभयंता आर.जी. मेहत्रे यांच्याकडे विद्युत विभागाचा पदभार साेपविण्यात आला होता. मेहत्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या प्रकल्पाला गती दिली. निविदाही प्रसिद्ध केली; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केली असता एक निविदा प्राप्त झाली. दरम्यान मेहत्रे हे दिवाळीपूर्वीच स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज देऊन रजेवर गेले आहेत. ते अद्याप हजर झालेले नाहीत. त्यामुळे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी नगररचना विभागातील उपभियंता वैभव जोशी यांना विद्युत विभाग प्रमुख म्हणून काम पाहण्याचा आदेश दिला; परंतु विद्युत विभागप्रमुख पदावर हजर न होता जोशी हेही रजेवर गेले आहेत. या विभागाचा प्रमुख म्हणून काम करण्यास कुणीच तयार होत नसल्याने आयुक्त मायकलवार हेही हतबल झाले आहेत.

....

- स्मार्ट एलईडी प्रकल्पासाठी एक निविदा प्राप्त झाली आहे. दुसऱ्यांदा एकमेव निविदा प्राप्त झाली असून, ती स्वीकारता येते; परंतु ही प्रक्रिया राबविण्यासाठी विभागप्रमुख असणे गरजेचे आहे; परंतु या विभागाचा प्रमुख म्हणून काम करण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळे निविदा उघडता येत नाही.

- श्रीकांत मायकलवार, आयुक्त

...

उपमहापौरांचा आंदोलनाचा इशारा

स्मार्ट एलईडी प्रकल्पासाठी एकमेव निविदा प्राप्त झाली असून, याबाबतची कार्यवाही तातडीने मार्गी लावावी, अन्यथा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा उपमहापौर मालन ढोणे यांनी दिला आहे.

Web Title: Smart LED project blacked out due to lack of department head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.