स्मायलिंगच्या विद्यार्थ्यांची मातोश्रीकडे कूच
By | Published: December 5, 2020 04:33 AM2020-12-05T04:33:57+5:302020-12-05T04:33:57+5:30
कृषिमंत्री, उद्योगमंत्री व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्यासह विद्यार्थी संघटनांची समिती गठित करून विद्यार्थ्यांना हक्काचा रोजगार मिळण्याची तरतूद करावी. कृषिमंत्री, ...
कृषिमंत्री, उद्योगमंत्री व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्यासह विद्यार्थी संघटनांची समिती गठित करून विद्यार्थ्यांना हक्काचा रोजगार मिळण्याची तरतूद करावी. कृषिमंत्री, उद्योगमंत्री व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्यासह विद्यार्थी संघटनांची समिती गठित करून विद्यार्थ्यांना हक्काचा रोजगार मिळण्याची तरतूद करावी, नव अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शासकीय कामे मिळावीत, निविदा पद्धत बंद करावी, फार्मसीनंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना कर्ज द्यावे, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना व्यवसाय नोंदणीसाठी असलेली फी माफ करावी, अशा अनेक मागण्यांसाठी संघटनेने हे आंदोलन केले आहे.
बुधवारी नगर येथील छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथून सकाळी १० वाजता पायी चालत विद्यार्थी मुंबईकडे निघाले. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आमरण अन्नत्याग सुरू करणार असल्याचे तोडमल यांनी सांगितले.
-------------
आमदारांची मध्यस्थी
विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा चासपर्यंत गेल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांंच्या मध्यस्थीने आंदोलकांना वाहन उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय जगताप यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री प्राजक्त तनपुरे व मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक राष्ट्रवादीच्या गाडीत मुंबईकडे रवाना झाले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, कार्याध्यक्ष विशाल म्हस्के आदी उपस्थित होते.
----------
फोटो - ०२स्मायलिंग १, २
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते बुधवारी नगरमधून पायी मुंबईकडे रवाना झाले.