कोपरगावातील नगदवाडीत छपरातील जमिनीतून आगीसह धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 04:38 PM2019-05-29T16:38:41+5:302019-05-29T16:39:08+5:30

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, नगदवाडी परिसरात छपरात रहात असलेल्या दाट लोकवस्तीतील मोरे यांच्या घरात सोमवारी दुपारी जमिनीतून धूर व आग बाहेर पडत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले.

Smoke with fires from the roof of the Kopargaon township | कोपरगावातील नगदवाडीत छपरातील जमिनीतून आगीसह धूर

कोपरगावातील नगदवाडीत छपरातील जमिनीतून आगीसह धूर

चांदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, नगदवाडी परिसरात छपरात रहात असलेल्या दाट लोकवस्तीतील मोरे यांच्या घरात सोमवारी दुपारी जमिनीतून धूर व आग बाहेर पडत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले. हा लाव्हारस तर नाही ना? या भितीने नागरिक भयभीत झाले. सदर घटनेची माहिती महसूल विभागाला कळल्यानंतर कामगार तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
नगदवाडी येथे सोमवारी दुपारी दोन वाजता बाळू गंगाधर मोरे यांच्या घरात अचानक जमिनीतून धूर निघू लागला. ही घटना घरात रहात असलेल्या मोरे व त्यांच्या कुटुंबाला कळाली. त्यांनी ताबडतोब स्थानिक नागरिकांना आवाज देत ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. शरद त्रिभुवन, नाना बत्तीशे, राधाची माळी, माजी सरपंच विजय जगताप आदींसह सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात धूर निघत असल्याची बातमी सोनवडी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घराबाहेर बघ्यांनी एकच गर्दी केली. पोलीस पाटील दगू गुडघे, सरपंच गंगाराम खोमणे यांनी याबाबतची माहिती प्रशासनाला कळविली. घरात असलेल्या अर्चना मोरे या लहान मुलीच्या हात,पायाला भाजले आहे. भीमा माळी, शरद त्रिभुवन यांचे हातही या उष्ण वाफेमुळे भाजले. नागरिकांनी जिथे धूर निघत होता तेथे खोदकाम केले, परंतु तेथे कोणत्याही स्वरूपाची वस्तू व इतर काही गोष्ट आढळून आली नाही. धूर नैसर्गिक असल्याचे प्रत्यक्षदर्शींना जाणवले. एकीकडे खोदल्यानंतर दुसºया ठिकाणीही धूर निघायला सुरूवात झाली. याठिकाणी ताबडतोब नागरिकांनी पाणी ओतून ती जागा भिजवून काढली. मग काही वेळाने तेथील वातावरण शांत झाले.

वरिष्ठ पातळीवर तपासणी करणार
कामगार तलाठी दत्तात्रेय बिन्नर आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. हा धूर कशामुळे निघाला? याची तपासणी वरिष्ठ पातळीवर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तहसीलदार योगेश चंद्रे यांनीही या घटनेच्या बाबतीत नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Smoke with fires from the roof of the Kopargaon township

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.