आयुक्तांच्या अंगावर धूर फवारणी
By Admin | Published: August 24, 2016 12:22 AM2016-08-24T00:22:39+5:302016-08-24T00:47:08+5:30
अहमदनगर : शहरातील कचरा, गढूळ पाणी आणि मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दुपारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
अहमदनगर : शहरातील कचरा, गढूळ पाणी आणि मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दुपारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. महापालिका आयुक्त दालनाबाहेर आले नाहीत म्हणून काही कार्यकर्ते धूर आणि औषध फवारणी करीत थेट आयुक्तांच्या दालनात घुसले. चक्क त्यांच्या अंगावरच धूर आणि औषधाची फवारणी केल्याने आयुक्त गडबडून गेले. दालनात संपूर्ण धूर झाल्याने दालनात उपस्थित असलेल्या आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांचा श्वास कोंडला. आयुक्तांच्या अंगावरच औषध फवारणी झाल्याने आयुक्त भिजले होते. त्यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या सभेत संग्राम जगताप यांनी अधिकारी आणि सत्ताधारी यांच्यावर सडकून टीका केली.
शहरातील आरोग्याच्या समस्या तीव्र आहेत. कचरा संकलन व्यवस्थित होत नाही. मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू आहे. गढूळ पाण्याचा पुरवठा होत असताना महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी झोपले आहेत. त्यांना जागे करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केल्याची भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी मांडली. वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ््यापासून मोटारसायकलवरून हा मोर्चा दुपारी बारा वाजता महापालिका कार्यालयावर धडकला. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला आणि जोरदार घोषणांनी महापालिका परिसर दणाणला. महापालिका आयुक्त दिलीप गावडे यांनी बाहेर येवून निवेदन स्वीकारावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित खोसे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे महापालिकेच्या पाठीमागील बाजूने फॉगिंग मशिन हाती घेवून धूर व औषध फवारणी करीत मोर्चामध्ये घुसले. धुराने मोर्चा पांगला. त्यानंतर खोसे व बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनात घुसले. तेथे आयुक्त काही अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत होते. कार्यकर्त्यांनी थेट आयुक्तांच्या अंगावरच धूर व औषध फवारणी केली. सलग पाच ते दहा मिनिटे ही फवारणी सुरू असल्याने आयुक्तांचे दालन धुराने भरून गेले. नाकातोंडात धूर गेल्याने काही कार्यकर्ते आणि अधिकारी दालनाच्या बाहेर पडले. धूर फवारणी आणि प्रचंड घोषणाबाजी एकाचवेळी सुरू होती. एका कार्यकर्त्याने फवारणी यंत्राने आयुक्तांना स्नान घातले. या गदारोळात काँग्रेसचे पदाधिकारी उबेद शेख यांनाही भोवळ आली. कार्यकर्त्यांच्या या गोंधळामुळे आयुक्त गावडे यांनी दालनाच्या बाहेर येवून समस्यांबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात माजी महापौर अभिषेक कळमकर, उबेद शेख, अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, दीपक सूळ, बाळासाहेब पवार, अरिफ शेख, अजय चितळे, अजिंक्य बोरकर, सुनील कोतकर, विजय गव्हाळे, जितु गंभीर, शेख नसीम, अरविंद शिंदे, निखिल वारे, रेश्मा आठरे, शारदा लगड, कुमार वाकळे, संपत बारस्कर, स्वप्नील शिंदे, माणिक विधाते, सागर गुंजाळ, अमित खामकर, दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
(प्रतिनिधी)
मोर्चासमोर आयुक्त येताच राष्ट्रवादी काँगेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आयुक्त गावडे यांच्या गळ््यात गढूळ पाण्यांनी भरलेल्या बाटल्यांची माळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा प्रकार टळला. महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा रेश्मा आठरे यांनी बाटल्यांमध्ये भरून आणलेले पाणी आयुक्तांनी पिवून दाखवावे, त्याशिवाय आम्ही हलणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाली. मात्र आमदार जगताप यांनी कार्यकर्त्यांना शांत केल्याने आयुक्तांवर पाणी पिण्याचे संकट टळले.
दोन महिन्यामध्ये महापालिकेची संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली आहे, असे सांगत आमदार जगताप म्हणाले, शहरातील समस्यांबाबत १६ आॅगस्टला निवेदन देवूनही महापालिकेने कार्यवाही केली नसल्याने आंदोलन करावे लागले. आंदोलनाच्या आदल्या दिवशी कार्यवाही करीत असल्याचे पत्र स्वीकारण्याचा प्रशासनाने आग्रह केला. मोकाट जनावरांबाबतही काहीच उपाय केले नाहीत. वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्याला व्यत्यय येत असेल तर त्यांना आम्ही नीट करू. महापालिकेवर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.