फळ वाहतुकीच्या वाहनातून दारुची तस्करी; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:13 PM2020-05-13T17:13:50+5:302020-05-13T17:14:29+5:30

फळ वाहतुकीच्या वाहनातून दारु तस्करी करताना दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी दुपारी शहरातील सक्कर चौकात ही कारवाई करण्यात आली. 

Smuggling of liquor from a fruit transport vehicle; Both arrested | फळ वाहतुकीच्या वाहनातून दारुची तस्करी; दोघांना अटक

फळ वाहतुकीच्या वाहनातून दारुची तस्करी; दोघांना अटक

अहमदनगर : फळ वाहतुकीच्या वाहनातून दारु तस्करी करताना दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी दुपारी शहरातील सक्कर चौकात ही कारवाई करण्यात आली. 
रामचंद्र भिमराव लोकरे (वय २७) व दीपक भारत शेळके (वय २५ रा़ दोघे रा़ कंदर, ताक़रमाळा जि़ सोलापूर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. फळ वाहतूक करणा-या पिकअपमधून दारुची तस्करी होत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सक्कर चौकात दुपारी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. तेव्हा एम़एच़-१७, बी़वाय़-१६१७ या पिकअपमध्ये विदेशी दारुच्या २३ बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण ६ लाख १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात विविध प्रकारे दारुतस्करी केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत नगर शहर व परिसरात रुग्णवाहिका, स्कूल व्हॅन तर आता फळ वाहतूक करणा-या वाहनातून दारुची तस्करी होताना आढळून आले आहे. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.
.... 
 

Web Title: Smuggling of liquor from a fruit transport vehicle; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.