Ahmednagar: ..तर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलन -अशोक ढवळे
By शेखर पानसरे | Published: April 27, 2023 01:22 PM2023-04-27T13:22:36+5:302023-04-27T13:23:31+5:30
Ahmednagar: शेतकरी, कामगार, कर्मचारी, श्रमिकांच्या मागण्यांसाठी अकोले ते लोणी या तीन दिवसांच्या पायी मोर्चात श्रमिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हा मोर्चा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरावर काढण्यात येत नसून तो त्यांच्या कार्यालयावर काढण्यात येतो आहे.
- शेखर पानसरे
संगमनेर - शेतकरी, कामगार, कर्मचारी, श्रमिकांच्या मागण्यांसाठी अकोले ते लोणी या तीन दिवसांच्या पायी मोर्चात श्रमिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हा मोर्चा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरावर काढण्यात येत नसून तो त्यांच्या कार्यालयावर काढण्यात येतो आहे.आम्ही लोणीच मध्येच चर्चा करणार, असे काही नाही. संगमनेरातही चर्चा करू. मात्र, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलन करण्यात येईल. असे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून बुधवारी (दि.२६) निघालेला मोर्चा संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील श्री रामेश्वर मंदिर परिसरात मुक्कामी होता. येथे गुरुवारी (दि.२७) अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ढवळे यांनी प्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, वनाधिकार कायद्याची न्याय अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
गेल्या चार-पाच वर्षात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, याकडे सरकार गांभीर्याने पाहिला तयार नाही. विमा कंपन्यांकडून देखील नुकसान भरपाई मिळत नाही. शेतमालाचे भाव सातत्याने कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के भावाची हमी द्यावी. आदी मागण्या आमच्या आहेत.