...तर, नगर शहर घेईल झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:31+5:302021-01-01T04:15:31+5:30

अहमदनगर : शहराचा विस्तार वेगाने होतो आहे. नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच नवनवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी तांत्रिक ...

... So, the city will take a leap | ...तर, नगर शहर घेईल झेप

...तर, नगर शहर घेईल झेप

अहमदनगर : शहराचा विस्तार वेगाने होतो आहे. नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच नवनवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र, अहमदनगर महापालिकेत तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता आहे. महापालिकेला तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास नगर शहर झेप घेईल. हाच नगर शहराच्या विकासाचा मंत्र आहे, असे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त मायकलवार हे गुरुवारी सेवानिवृत्त झाले. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदाचा १६ मार्च २०२० रोजी पदभार स्वीकारला. तो काळ अत्यंत कठीण होता. कोविड-१९ नगर शहरात येऊन धडकला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान समोर होते. कोरोनाची परिस्थिती हातळताना इतर कामे करता आली नाहीत; पण गेल्या दहा महिन्यांत काम करताना वेळोवेळी जी उणीव भासली ती म्हणजे तांत्रिक मनुष्यबळ. तांत्रिक मनुष्यबळाअभावी अनेक अडचणी निर्माण होतात. कारभाराला गती द्यायची असेल, तर सर्वप्रथम तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करावे लागेल. एकच अधिकारी अनेक विभागांचा कारभार पाहतो आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढलेला आहे. कामे उरकत नाहीत. त्याचा थेट परिणाम शहराच्या विकासावर होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले, मायकलवार म्हणाले.

महापालिकेत पाणीपुरवठा, विद्युत, प्रकल्प, सामान्य प्रशासन, बांधकाम, अतिक्रमण, मुख्य लेखा परीक्षक, नगररचना, प्रसिद्धी, या विभागांत प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. बांधकाम विभागात तर संपूर्ण शहरासाठी दोनच अभियंते आहेत. नागिरकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होणे अपेक्षित आहे; परंतु अभियंत्यांअभावी तक्रारींचा निपटारा होत नाही. दैनंदिन कामं वेळेत पूर्ण हाेऊ शकत नाहीत. तांत्रिक मनुष्यबळच नसेल, तर नवीन प्रकल्प राबविणार कसे, असा प्रश्न आहे.

...

विभागप्रमुखांमध्ये समन्वय असावा

महापालिकेत बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता, नगररचना, लेखा व वित्त हे महत्त्वाचे विभाग असतात. या विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक बुधवारी विभागप्रमुखांची समन्वय बैठक घेतली. त्यामुळे अडचणींवर सखोल चर्चा होऊन प्रश्न मार्गी लागले. समन्वय नसल्याने आधी रस्ता करायचा आणि नंतर तोच रस्ता पाइपलाइन टाकण्यासाठी खोदायचा, असा प्रकार इथे सुरू होता. तो बंद केला. समन्वय बैठक या पुढील काळात सुरूच ठेवावी, जेणेकरून कारभाराला गती येईल, असे आयुक्त मायकलवार यांनी आवर्जून सांगितले.

..

Web Title: ... So, the city will take a leap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.