..तर संबंधित डॉक्टर, लॅबवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:21 AM2021-05-13T04:21:48+5:302021-05-13T04:21:48+5:30
निघोज : पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी दवाखाने व खासगी लॅब चालकांनी रुग्णांना कोरोनाबाबतची काही ...
निघोज : पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी दवाखाने व खासगी लॅब चालकांनी रुग्णांना कोरोनाबाबतची काही लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करण्यास सांगावे. ते कोरोना बाधित आढळल्यास त्यांना घरी न पाठवता त्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवावे. तसेच याबाबतची माहिती प्रशासनास तत्काळ द्यावी. अशा रुग्णांना परस्पर औषधे देऊन घरी पाठविणाऱ्या डाॕॅक्टर व लॅबवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिला.
निघोज (ता.पारनेर) येथील संदीप पाटील कोविड सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्राची भोसले यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
वराळ कोविड सेंटरमध्ये ४५ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. ५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. येथे नाश्ता, जेवण, फळे दिली जातात. नियमित योगासने घेत असल्याची माहिती सचिन वराळ यांनी दिली. यावेळी उपसरपंच माउली वरखडे, मंडळाधिकारी पंकज जगदाळे, कामगार तलाठी आकाश जोशी, ग्रामसेवक डी. जी. वाळके, दत्ता उनवणे, संतोष इधाटे, आरोग्य अधिकारी रोहिणी ढोने, संदेश थोरात, फार्मसिस्ट जे. बी. खेडकर, आरोग्य सेविका अर्चना कवठाळे, सुमन शेटे, भीमा लामखडे, मंगेश वराळ, रावसाहेब वराळ, साजीद तांबोळी, अस्लम इनामदार, श्रीकांत पवार, सौरभ वराळ, आकाश वराळ, रमीज शेख, संतोष वराळ, संदेश म्हस्के आदी उपस्थित होते.
---१२ निघोज
निघोज येथील वराळ कोविड सेंटरची पाहणी करताना प्रांताधिकारी सुधाकर भोसले व इतर.