....तर जास्त पाणी येणारे नळ सिमेंट लावून बंद करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:22 AM2021-03-10T04:22:44+5:302021-03-10T04:22:44+5:30
अहमदनगर : पाणी येत नसेल, तर नळ बंद करून टाका, असे मनपाचे कर्मचारी सांगत असून, ही बाब महापौरांच्या निदर्शनास ...
अहमदनगर : पाणी येत नसेल, तर नळ बंद करून टाका, असे मनपाचे कर्मचारी सांगत असून, ही बाब महापौरांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, काहीही उपायोग झाला नाही. येत्या दोन दिवसांत नवीन हडको परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा ज्या नळांना जास्त पाणी येते, ते नळ सिमेंट लावून बंद करू, असा इशारा महिलांनी मंगळवारी दिला.
नवीन हडको येथील पाणीप्रश्नी महिलांनी सहायक आयुक्त सचिन राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शकुंतला कांबळे, कोकिळा शिंदे, शिल्पा बाचल, लता मचा, योगिता रोकडे, सुलोचना अकोलकर, सुनिता नायडू, सुचिता खडामकर, शकुंतला ओव्हाळ, नर्मदा वासल, सुनिता नायडू, अनिता मस्के, वैशाली आघावणे, कामिनी आहेर, कीर्ती बाचल, सीमा धोकटे, आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रेमदान हडको परिसरात मागील सहा ते सात वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरातील तीस घरांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ज्या नळांना ज्यादा पाणी येते, त्या नळांवर पाणी भरण्यासाठी जावे लागते. तिथे दाेन हंड्यापेक्षा जास्त पाणी मिळत नसल्याची तक्रार महिला यावेळी केली.
...
सहायक आयुक्त म्हणतात, ‘मनपात येऊन काय होणार...’
महिला मोर्चाने सहायक आयुक्त राऊत यांच्याकडे गेल्या असता, राऊत यांनी महापालिकेत येऊन काय होणार, असा अजब सवाल केला. त्यामुळे उपस्थित महिला चांगल्या संतापल्या. सहायक आयुक्तांच्या या विधानाचा निषेध करत, महिलांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
....
सूचना फोटो ०९ एएमसी नावाने आहे.