एकविरा फाऊंडेशनचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:18 AM2021-02-15T04:18:51+5:302021-02-15T04:18:51+5:30
तालुक्यातील जोर्वे येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात शनिवारी (दि. १३) एकविरा फाऊंडेशनच्यावतीने गोरगरीब, गरजू विद्यार्थिनींना १०० सायकलींचे मोफत वितरण करण्यात ...
तालुक्यातील जोर्वे येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात शनिवारी (दि. १३) एकविरा फाऊंडेशनच्यावतीने गोरगरीब, गरजू विद्यार्थिनींना १०० सायकलींचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. जिल्हा बँकेचे संचालक अॅड. माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संचालक इंद्रजीत थोरात, सामाजिक कार्यकर्त्या कांचन थोरात, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयु देशमुख, डॉ. हसमुख जैन व डॉ. जयश्री थोरात-जैन, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, शांता खैरे, वंदना मुरकुटे, सुरेश थोरात, संजय थोरात, माणिक यादव, शिवाजी दिघे, मीनाक्षी थोरात, अभिजीत बेंद्रे आदी उपस्थित होते. डॉ. थोरात या टाटा हॉस्पिटल (मुंबई) येथे कॅन्सरतज्ज्ञ म्हणून सेवेत आहेत. त्यांना मिळणाऱ्या मानधनातून त्यांनी पैशांची बचत करत सायकलींची खरेदी करून त्या वितरण केल्या.
एकविरा फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील तीन वर्षात शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी उपक्रम, आदिवासी महिलांची आरोग्य तपासणी, गणेशोत्सवात विर्सजनावेळी गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन, कोरोना संकटात गरजूंना भरीव मदत असे अनेकविध उपक्रम हाती घेत ते यशस्वी झाले, असेही महसूलमंत्री थोरात म्हणाले.
प्रा. वृषाली साबळे, डॉ. सुरभी आसोपा, शिल्पा गुंजाळ, ज्योती थोरात, सुरभी मोरे, अहिल्या ओहोळ, शिवानी वाघ, ऐश्वर्या वाकचौरे, मिताली भडांगे, शिला पंजाबी, मयुरी थोरात, पुजा थोरात आदी यावेळी उपस्थित होते.