गाव कारभारणींनी जोपासली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:52+5:302021-05-10T04:20:52+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे सरपंच राणी मच्छिंद्र कातोरे आणि उपसरपंच अर्चना बापू कातोरे या गावकारभारणींनी गावातील ...
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे सरपंच राणी मच्छिंद्र कातोरे आणि उपसरपंच अर्चना बापू कातोरे या गावकारभारणींनी गावातील गरजू व गरीब कुटुंबांना किराणा वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे आपल्या गावातील गरीब जनतेचे होणारे हाल पाहता सरपंच राणी कातोरे व उपसरपंच अर्चना कातोरे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासताना गावातील दोनशेहून अधिक गरजू व गरीब कुटुंबांना माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते एक महिन्याचा किराणा वाटप करण्यात आला.
यावेळी पंडित कातोरे, प्रसाद महाडिक, हरी महाडिक, शंकर गोलांडे, बंडू कातोरे, सोमनाथ गोलांडे, नितीन देवडे, किरण कातोरे, बापू पंदरकर, ग्रामसेवक राजू इधाटे, सोमनाथ करांडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
--
०९देवदैठण
श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे गरजूंना किराणा वाटप करताना माजी आमदार राहुल जगताप व मान्यवर.