खर्डा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सामाजिक संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:51+5:302021-09-23T04:23:51+5:30
खर्डा : खर्डा (ता .जामखेड) ग्रामपंचायतीने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविली. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छता, कोरोना, शौचालय ...
खर्डा : खर्डा (ता .जामखेड) ग्रामपंचायतीने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविली. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छता, कोरोना, शौचालय बांधा, मुलगी वाचवा मुलगी शिकवा आदी विविध सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन रविवारी गावातून गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती.
विसर्जन मिरवणुकीत सरपंच नमिता आसाराम गोपाळघरे, उपसरपंच रंजना श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्या सुनीता दीपक जावळे, कांचन गणेश शिंदे, वैभव जमकावळे, राजू मोरे, मदन गोलेकर पाटील, महेश दिंडोरे, महालिंग कोरे, आसाराम गोपाळघरे, श्रीकांत लोखंडे, वैजीनाथ पाटील, अशोक खटावकर, सुग्रीव भोसले, गणेश शिंदे, विजयसिंह गोलेकर, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.
---
२२ खर्डा
सामाजिक संदेश देणारे फलक हाती घेऊन खर्डा येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर.