कोरोनाकाळातील लोखंडे दांपत्याचे सामाजिक काम लाखमोलाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:16 AM2021-05-03T04:16:01+5:302021-05-03T04:16:01+5:30
देवदैठण : सध्याच्या कोरोनाकाळातील लोखंडे दांपत्याने कोविड सेंटरच्या रूपाने सुरू केलेले सामाजिक काम लाखमोलाचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम ...
देवदैठण : सध्याच्या कोरोनाकाळातील लोखंडे दांपत्याने कोविड सेंटरच्या रूपाने सुरू केलेले सामाजिक काम लाखमोलाचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिराच्या (कोविड सेंटर) उद्घाटनप्रसंगी जगताप बोलत होते.
सध्या सर्वत्र कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असून, ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढला आहे. येळपणे गटातील गरीब रुग्णांना योग्य व वेळेत उपचार मिळावे म्हणून सुरू झालेले कोविड सेंटर संकटाच्या काळात महत्त्वाचे आहे, असे माजी आमदार राहुल जगताप याप्रसंगी म्हणाले. येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेत हे कोविड आरोग्य मंदिर सुरू झाले आहे.
यावेळी घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, राजेंद्र नागवडे, सभापती मनोज कोतकर, सभापती गीतांजली पाडळे, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, दत्तात्रय वाघमारे, अशोक वाखारे, सोमनाथ वाखारे, संजय इथापे, सुरेश लोखंडे, सुभाष वाघमारे, सुभाष राक्षे, सुखदेव तिखोळे, मंगल कौठाळे, सर्व डॉक्टर, आरोग्यसेविका आदी उपस्थित होते. सुरेश लोखंडे यांनी आभार मानले.
---
गेल्यावर्षीही केली मदत..
गेल्यावर्षी कोरोनाकाळात सामाजिक बांधिलकी जपताना लोखंडे दांपत्याने येळपणे गटात एक हजार ७६८ कुटुंबांना किराणा वाटप केले होते. आताही कोविड आरोग्य मंदिर सुरू करून परिसरातील कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---
०२ लोखंडे
देवदैठण येथील कोविड सेंटरचे उद्घाटन करताना आमदार संग्राम जगताप, माजी आमदार राहुल जगताप व इतर.
फोटो ओळी :
कोविड आरोग्य मंदिरचे उद्घाटन करताना आमदार संग्राम जगताप व समवेत मान्यवर मंडळी .( फोटो -संदीप घावटे )