छत्रपतींच्या विचारानेच समाजव्यवस्था भक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:38 AM2021-02-21T04:38:05+5:302021-02-21T04:38:05+5:30
दहिगावने : छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांनी समाजाला दिलेले विचार आजच्या समाजाला दिशादर्शक आहेत. या ...
दहिगावने : छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांनी समाजाला दिलेले विचार आजच्या समाजाला दिशादर्शक आहेत. या विचारामुळेच आजची समाज व्यवस्था भक्कम असल्याचे प्रतिपादन महंत सुनीलगिरी महाराज यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे शिवजयंती निमित्त सुनीलगिरी महाराज यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दघ्नेश्वर शिवलायाचे प्रमुख कृष्णदेव महाराज काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, दत्तास्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले, जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे, दत्तात्रय महाराज काळे, सीताराम महाराज चेडे, अशोक महाराज बोरुडे, देविदास महाराज बोरुडे, भूषण महाराज मासाळ, कैलास महाराज चव्हाण, रामकृष्ण महाराज काळे व्यासपीठावर उपस्थित होते.
सकाळी गावातून टाळमृदुंगाच्या गजरात शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. औरंगाबाद येथील आर आर फाउंडेशनचे विनोद पाटील यांच्यावतीने अश्वारूढ शिवप्रतिमेवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
कांता लक्ष्मण काळे यांच्या वतीने शिवप्रेमींना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, सेवा संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्ष संजय शेळके, माजी सभापती त्रिंबक जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जरे, संतोष शेळके, निलेश कुंभकर्ण, बंडू तोरमड, विष्णू जाधव, प्रवीण मरकड, मीननाथ थोरात, सुधाकर शिरसाठ, सदाशिव जाधव, माजी सरपंच कचरू शेळके, शिवस्मारक समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा संजय काळे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र काळे यांनी केले. भागवत जरे यांनी आभार मानले.