गोदावरी नदीकाठी माती उत्खननास परवानगी देऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:29+5:302021-04-13T04:19:29+5:30
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील गोदावरी नदीकाठी असलेल्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन होत आहे. उत्खनन केलेल्या मातीची वाहतूक ...
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील गोदावरी नदीकाठी असलेल्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन होत आहे. उत्खनन केलेल्या मातीची वाहतूक अवजड डंपरमधून केली जात आहे. त्यामुळे गावांसह परिसरातील रस्त्यांचे वाटोळे होत आहे. त्यामुळे यापुढे कोकमठाण हद्दीतील माती उत्खननास परवानगी देऊ नये, अशा मागणीचे निवेदन कोकमठाण ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्र यांना सोमवारी (दि.१२) देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बेसुमार उत्खनन होत असलेल्या जमिनीलगतच्या इतर जमिनींनादेखील धोका निर्माण झाला आहे. हे उत्खनन असेच सुरू राहिल्यास भविष्यात गोदावरी नदी तिचा प्रवाह बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेता यापुढे माती उत्खननास परवानगी देऊ नये.