संगमनेर तालुक्यात कारच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 04:30 PM2018-05-02T16:30:29+5:302018-05-02T16:30:48+5:30
कारने जोरदार धडक दिल्याने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात अरूण लक्ष्मण घाटकर (वय ५५, रा. आंबीखालसा, ता. संगमनेर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. नाशिक पुणे महामार्गावरील आंबीखालसा शिवारात हा अपघात झाला.
संगमनेर : कारने जोरदार धडक दिल्याने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात अरूण लक्ष्मण घाटकर (वय ५५, रा. आंबीखालसा, ता. संगमनेर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. नाशिक पुणे महामार्गावरील आंबीखालसा शिवारात हा अपघात झाला.
घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक-पुणे महामार्गावर आंबीखालसा येथे गावास जोडणाऱ्या दुभाजकातील रस्त्यावरून अरूण घाटकर आपल्या दुचाकीवरुन (क्रमांक एम. एच. १७ बी. एच. २५५८) वळत होते. त्याचवेळी पुण्याहून नाशिककडे जाणा-या कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात अरूण घाटकर गंभीर जखमी झाले. त्यांना संगमनेर येथे उपचारासाठी नेले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी जाहीर केले. याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवून तो घारगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
आंबीखालसा येथे गावाला जोडणा-या दुभाजकातील रस्त्यावर सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याने यापूर्वीही अपघात झाले आहेत. या उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी स्वराज्य युवा मंच व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. संबंधितांनी याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्यापही हा प्रश्न रेंगाळलेला आहे.