लसीकरण मोहिमेला काहींचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:26+5:302021-05-28T04:16:26+5:30

आरोग्य विभाग व नगरपालिका स्वखर्चातून प्रत्येक प्रभागात जात आहे. मोफत चाचणी असूनही मनापासून प्रतिसाद मिळत नाही असा अनुभव येत ...

Some lost to the vaccination campaign | लसीकरण मोहिमेला काहींचा खो

लसीकरण मोहिमेला काहींचा खो

आरोग्य विभाग व नगरपालिका स्वखर्चातून प्रत्येक प्रभागात जात आहे. मोफत चाचणी असूनही मनापासून प्रतिसाद मिळत नाही असा अनुभव येत आहे. अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. मात्र काही ठरावीक लोक हेतुपुरस्सर चाचणीसाठी पुढे यायला तयार नाहीत, असे वहाडणे यांनी पत्रकात म्हटले आहे.

संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सरकारे, सर्वसामान्य जनता प्रयत्न करत आहे. प्रशासकीय यंत्रणा जीव धोक्यात घालून कोरोना योद्धे बनून काम करत आहेत. मात्र इतरवेळी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रांगा लावणारे चाचणीपासून पळ काढत आहेत. चाचणीला टाळाटाळ करत आहेत. आता सरकारने कठोर भूमिका घेऊन देशातल्या प्रत्येक नागरिकाला यासाठी सक्ती करावी, असे आवाहन वहाडणे यांनी केले आहे. सरकारी आदेश न पाळणाऱ्या लोकांचे सर्व प्रकारचे शासकीय अनुदान व इतर लाभ बंद करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. कोरोनाविरुद्धच्या मोहिमेला प्रतिसाद द्यायचा नाही अशा प्रवृत्तीच्या लोकांसाठी कडक नियम लावावे, असे वहाडणे यांनी म्हटले आहे. राजकीय नेत्यांनीही कार्यकर्त्यांना चाचणीकरिता प्रोत्साहित करावे व केवळ मतांचे राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

-------

Web Title: Some lost to the vaccination campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.