संगमनेर शहरातील काही भाग २२ मे पर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:32 AM2020-05-09T10:32:34+5:302020-05-09T10:33:03+5:30
संगमनेर शहरातील कुरणरोड परिसर आणि मौजे धांदरफळ बुद्रूक येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्ती शुक्रवारी आढळून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील काही भाग २२ मे पर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.
अहमदनगर : संगमनेर शहरातील कुरणरोड परिसर आणि मौजे धांदरफळ बुद्रूक येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्ती शुक्रवारी आढळून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील काही भाग २२ मे पर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.
संगमनेर शहरातील इस्लामपुरा, कुरण रोड, बिलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पूनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, तसेच कुरण (ता. संगमनेर ) व मौजे धांदरफळ बुद्रूक हे क्षेत्र हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून जवळपास दोन किलोमीटर परिसर कोअर एरिया म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घोषित केला आहे. या क्षेत्रातील सर्व अस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी ९ मे ते २२ मे पर्यंत सकाळी ६ वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशसनाच्या वतीने केले आहे.