सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित
By Admin | Published: August 27, 2014 11:05 PM2014-08-27T23:05:02+5:302014-08-27T23:09:41+5:30
सोनई : सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना निलंबित करण्यात आले आहे.
सोनई : सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना निलंबित करण्यात आले आहे. सोनई येथे गेल्या आठवड्यात दोन वेळा गावठी कट्ट्यातून झालेला गोळीबार वांगडे यांच्या गच्छंती मागे कारण असल्याचे बोलले जाते.
जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचा हा आदेश वांगडे यांना बजविला. मंगळवारी रात्रीच सहाय्यक पोलीस निरीक्षकपदाची अनिल मोहनदास बेहराणी यांनी सूत्रे स्वीकारली. बेहराणी जळगाव येथील रहिवासी असून ते नवी मुंबई व गडचिरोली येथे दहा वर्षे सेवेत होते.
(वार्ताहर)
वर्षात तीन अधिकारी निलंबित
सोनई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना २० मे २०१३ रोजी, त्यानंतर दोनच महिन्यात उपनिरीक्षक रंजवे यांना तत्कालीन पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी निलंबित केले होते. आता सचिन वांगडे यांना निलंबित करण्यात आले आहे.