रास्तारोकोचा इशारा देताच शेतपंपांची वीज सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:58 AM2021-02-20T04:58:47+5:302021-02-20T04:58:47+5:30

पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे परिसरातील पाच गावांचा शेतीपंपांचा वीज पुरवठा तीन दिवसांपासून पाच गावांचा बंद होता. शेतकऱ्यांनी रास्ता ...

As soon as Rastaroko signals, the power of farm pumps is smooth | रास्तारोकोचा इशारा देताच शेतपंपांची वीज सुरळीत

रास्तारोकोचा इशारा देताच शेतपंपांची वीज सुरळीत

पळवे

: पारनेर तालुक्यातील पळवे परिसरातील पाच गावांचा शेतीपंपांचा वीज पुरवठा तीन दिवसांपासून पाच गावांचा बंद होता. शेतकऱ्यांनी रास्ता रोकोचा इशारा देताच महावितरणने हा वीजपुरवठा सुरळीत केला.

पळवे खुर्द, पळवे बुद्रूक, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी गावांचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून वीजबील थकित असल्याने सरसकट बंद केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सध्या कांदा, गहू, हरभरा, ही पिके जोमात असताना वीज खंडित केल्यामुळे पिके संकटात सापडली होती. महावितरणने सरसकट वीज बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. अखेर पंचक्रोशीतील शेतकरी, मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार, गंगाधर कळमकर आदींनी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. तसेच टप्प्याटप्प्याने थकित विजबीले भरण्याची ग्वाही दिली. त्यानंतर सहायक अभियंता रूद्राकर यांनी वीज पुरवठा सुरळीत केला.

य वेळी अक्षय सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम कळमकर, उपसरपंच शिवाजी पळसकर, राजाभाऊ जाधव, सुरेश कळमकर, राजू पळसकर, सागर जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: As soon as Rastaroko signals, the power of farm pumps is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.