वंचित बहुजन आघाडीची दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर
By | Published: December 5, 2020 04:33 AM2020-12-05T04:33:59+5:302020-12-05T04:33:59+5:30
अध्यक्ष, महासचिव यांच्याबरोबरच ५ उपाध्यक्ष, ३ सचिव, ६ संघटक, ३ सल्लागार व १ प्रसिद्धीप्रमुख अशी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात ...
अध्यक्ष, महासचिव यांच्याबरोबरच ५ उपाध्यक्ष, ३ सचिव, ६ संघटक, ३ सल्लागार व १ प्रसिद्धीप्रमुख अशी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. प्रतीक बारसे (जिल्हाध्यक्ष -दक्षिण), योगेश साठे (महासचिव), सुरेश कोंडलकर (कर्जत), योगेश सदाफुले (जामखेड), अरविंद सोनटक्के (पाथर्डी), बंन्नो शेख (शेवगाव), संतोष गलांडे (श्रीगोंदा) अशा ५ उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. तर चंद्रकांत नेटके (कर्जत), सुनील बाळू शिंदे (श्रीगोंदा), बाळासाहेब कांबळे (नगर तालुका) असे ३ सचिव तसेच फिरोज पठाण (नगर शहर), नंदकुमार गाडे (कर्जत), भीमराव चव्हाण (जामखेड), दत्तात्रय अंदुरे (पाथर्डी), सुरेश खंडागळे (शेवगाव) अशा ६ संघटकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रा. जीवन पारधे (अहमदनगर शहर), चंद्रकांत डोलारे (कर्जत), वसंत नितनवरे (श्रीगोंदा) अशा ३ सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली. तसेच भगवान राऊत यांची प्रसिद्धीप्रमुखपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
यापुढे प्रत्येक तालुक्यातील किमान ५ कार्यकर्त्यांचा समावेश करून जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी अहमदनगर दक्षिणमधील तालुकाध्यक्षांनी लवकरात लवकर आपापल्या तालुक्यातील ५ कार्यकर्त्यांची नावे मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावीत तसेच संपूर्ण जिल्ह्यातील शहर, तालुका, गाव, गण, यासाठीदेखील कार्यकर्त्यांची नावे मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावीत असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे व महासचिव योगेश साठे यांनी केले आहे.