पुरेसा पाऊस नसल्यास पेरणी करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:47+5:302021-06-25T04:16:47+5:30
निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज परिसरासह तालुक्यात काही ठिकाणी पाऊस आहे. मात्र, बाजरी, सोयाबीन व कडधान्ये पेरणीसाठी पुरेसा पाऊस ...
निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज परिसरासह तालुक्यात काही ठिकाणी पाऊस आहे. मात्र, बाजरी, सोयाबीन व कडधान्ये पेरणीसाठी पुरेसा पाऊस नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी केले आहे.
हंगामाच्या सुरुवातीला यंदा काहीसा पाऊस झाला. मात्र, तो पेरणीसाठी पुरेसा नाही. कमी पावसामुळे जमिनीची अंतर्गत उष्णता कायम आहे. त्यामुळे ज्या भागात मोठा पाऊस झाला नाही त्यांनी पेरणी करताना सावधनता बाळगावी. पेरणीची घाई केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचेही संकट उभे राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
---
पारनेर तालुक्यात सुरुवातीचा पाऊस झाल्यानंतर नंतर पावसाने उघडीप दिली. शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच योग्य ओलीवर व योग्य खोलीवरच पेरणी करावी.
- विलास गायकवाड,
तालुका कृषी अधिकारी, पारनेर
----
शेतकरी आमच्याकडे बियाणे, खते खरेदी करण्यासाठी आल्यानंतर त्यांना पेरणीयोग्य पाऊस झाला का, असे आम्ही विचारतो. पेरणी योग्य पाऊस असल्यासच पेरणी करा, असे सांगतो. शेतकऱ्यांनीही पेरणीची घाई करू नये, असेही आवाहन करतो.
-राहुल निचीत /सचिन वरखडे,
अध्यक्ष/सचिव, तालुका कृषी असोसिएशन, पारनेर