मराठमोळ्या स्वागताने स्पेनचे दाम्पत्य भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 09:51 AM2019-09-11T09:51:46+5:302019-09-11T09:52:51+5:30
स्पेन येथील रहिवासी व भारतीय संस्कृती तत्वज्ञानाचे अभ्यासक ज्ञानदेव पीटरसन, मीरा पीटरसन या पती-पत्नींनी श्रीक्षेत्र वृद्धेश्वर (ता.पाथर्डी) येथे सोमवारी दर्शन घेतले. स्वयंभू शिवलिंगाची पूजा, महाभिषेक करीत ध्यानसाधनेतही ते रममाण झाले. येथील निसर्गाची त्यांनी भुरळ पडली.
तिसगाव : स्पेन येथील रहिवासी व भारतीय संस्कृती तत्वज्ञानाचे अभ्यासक ज्ञानदेव पीटरसन, मीरा पीटरसन या पती-पत्नींनी श्रीक्षेत्र वृद्धेश्वर (ता.पाथर्डी) येथे सोमवारी दर्शन घेतले. स्वयंभू शिवलिंगाची पूजा, महाभिषेक करीत ध्यानसाधनेतही ते रममाण झाले. येथील निसर्गाची त्यांनी भुरळ पडली.
योगगुरू रामदेवबाबा यांचे हरिद्वार शिबिरात घाटशिरसचे भूमिपुत्र (आळंदी रहिवासी) हरिदास शास्री यांच्याशी झालेल्या मैत्रीच्या आग्रहानंतर ते वृद्धेश्वर येथे आले होते. शास्री यांचे घाटशिरस येथील घरी झालेल्या अस्सल मराठमोळ्या स्वागताने व सुग्रास पुरणपोळी कुरडई, पापड, आमटी अशा मेन्यूच्या भरपेट जेवणाने परदेशी पाहुणे भारावून गेले. संस्कृत श्लोकाचे उच्चारण या कुटुंबाने सामूहिकपणे केले. जेवणानंतर पालवेवस्ती येथे दृष्टीस पडलेल्या जनावरांच्या छावणीला या पाहुण्यांनी भेट देऊन शेतकºयांशी संवाद साधला.
वृद्धेश्वर येथील स्वयंभू शिवपिंडीच्या गाभा-यात ध्यानाच्या माध्यमातून जाणवलेली आध्यात्मिक स्पंदने संपूर्ण भारतभर केलेल्या प्रवास भेटीत कुठेही अनुभवास आली नाहीत. पुरेसे आर्थिक स्थैर्य नसतानाही भारतीय लोक समाधानी आनंदी जगतात. सर्वांगीण सुंदर अशी भारतीय कुटुंब व्यवस्था याबाबी मनाला भावल्या असल्याचे या परदेशी पाहुण्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.