पशुधन विकासासाठी जिल्हा परिषदेचे विशेष प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:19 AM2021-02-12T04:19:36+5:302021-02-12T04:19:36+5:30
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत एकूण ४ कोटी ९० लाखांचा निधी वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातील ...
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत एकूण ४ कोटी ९० लाखांचा निधी वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातील लाभार्थींची निवड सोडत पद्धतीने सभापती गडाख यांच्या हस्ते करण्यात आली. गुरुवारी जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या या सोडतीवेळी सभापती रावसाहेब कांगुणे, जि. प. सदस्य राजेश परजणे, बाळासाहेब हराळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, डॉ. बाळकृष्ण शेळके, धनंजय खेडकर, दयानंद जगताप, डॉ. वृषाली भिसे, दिग्विजय जामदार, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.
वैयक्तिक लाभाच्या विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना, सर्वसाधारण योजनांसाठी लाभार्थी निवड करण्यात आली. यात गाय गट वाटप, शेळी गट वाटप, पशुखाद्य वाटप, वैरण विकास योजना, एक दिवसीय कुक्कुट पिल्ले योजनांचा समावेश आहे. या लाभार्थी निवड प्रक्रियेवेळी सर्व पंचायत समित्यांचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व पशुधन पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------
फोटो - ११पशुसंवर्धन निवड
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभांच्या योजनेसाठी सोडतीने लाभार्थींची निवड करण्यात आली.