वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांचा विशेष सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:40+5:302021-02-10T04:20:40+5:30

राहाता : कोथरूड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल, राहाता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुल, ...

Special felicitation to Senior Inspector of Police Meghshyam Dange | वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांचा विशेष सत्कार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांचा विशेष सत्कार

राहाता : कोथरूड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल, राहाता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुल, रोटरी क्लब, शिर्डी व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच डांगे यांचा सत्कार करण्यात आला. येथील डांगे पॅटर्नचे प्रणेते इंद्रभान डांगे यांचे ते लहान बंधू आहेत. त्यांनी आजवर नागपूर, पिंपळगाव बसवंत, धुळे, अंबरनाथ, ठाणे, उल्हासनगर, अक्कलकुवा येथे सेवा दिली आहे.

यावेळी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात डॉ.मधुकर देशमुख यांचे शुभहस्ते व डॉ.पांडुरंग गुंजाळ यांचे प्रमुख उपस्थितीत मेघश्याम डांगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश डांगे, कार्याध्यक्ष भगवान डांगे, निखिल बोरावके, मजीद पठाण, राजेंद्र कोते, गफार पठाण, शरद निमसे, माजिद पठाण, राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, पत्रकार सतीश वैजापूरकर, ॲड.नानासाहेब बोठे, रविकिरण डाके, दत्तात्रय सदाफळ, प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाच्या उपाध्यक्षा स्नेहलता डांगे, संचालिका पूनम डांगे, गंगोत्री देवढे, शिवाजी देवढे, संदीप वाव्हळ, सतीश पाटील, स्वाती धनवटे, अशोक गाढवे, जालिंदर धनवटे, विष्णू वर्धन, गणेश शार्दुल, किशोर नवले, अरविंद पवार आदी शिक्षक यांच्यासह दहेगाव व राहाता पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तसेच प्रीतिसुधाजी स्कूलचे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

०९ डांगे

Web Title: Special felicitation to Senior Inspector of Police Meghshyam Dange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.