चाचण्यांची गती वाढली, लसीकरण मंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:23 AM2021-05-27T04:23:20+5:302021-05-27T04:23:20+5:30
अहमदनगर : जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत २३ टक्के लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यातील २५ टक्के ...
अहमदनगर : जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत २३ टक्के लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यातील २५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, तर एकूण लोकसंख्येनुसार हे प्रमाण ५ टक्केच असल्याचे दिसते. लसीकरणाची गतीही अद्याप मंदच असून केवळ १४ टक्के नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. त्यात आता म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण शंभरवरून १७८ वर गेले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असली तरी पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनोचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
जिल्ह्यात एकूणच कोरोनाची स्थिती, हाताळणारी यंत्रणा, लसीकरणाची स्थिती याची ही माहिती.
-------------
पॉझिटिव्ह रुग्ण
एकूण पॉझिटिव्ह- २, ५२, ९७०
दहा दिवसांमधील पॉझिटिव्ह-२४,२१७
फेब्रुवारी-२०२१मधील रुग्ण -३६४५
मार्च-२०२१मधील रुग्ण -१९०४१
एप्रिल-२०२१मधील -८०,११८
२५मे पर्यंत रुग्ण- ७७९३०
----------------
कोरोना चाचणी
एकूण चाचण्या-१०,३५,९०३
आरटीपीसीआर-५,३४,७०५
रॉपिड अँटिजेन-५,०१,१९८
मार्च-२०२१मधील चाचण्या-६७,५५१
एप्रिल-२०२१ मधील चाचण्या-२,२३,३१२
मे-२०२१ मधील चाचण्या-३,३०,७८४
----------------
बरे होण्याची स्थिती
बरे झालेले रुग्ण-२,३४,६६५
बरे होण्याचे प्रमाण- ९२.७६ टक्के
महाराष्ट्र-९२.५१ टक्के
भारत-८८.६९ टक्के
-----------
मृत्यू झालेले रुग्ण
एकूण मृत्यू-२९०३
फेब्रुवारी-२०२१मधील मृत्यू-४८
मार्च-२०२१ मधील मृत्यू-१६४
एप्रिल-२०२१मधील मृत्यू-९४१
मे-२०२१ मधील मृत्यू-६४९
---------------
पॉझिटिव्ह रेट
सध्याचा रेट-२५.११ टक्के
एप्रिल-२०२१-३६.०२ टक्के
मे-२०२१-२३.०१ टक्के
-------------
सर्वात जास्त सक्रिय रुग्ण असलेले तालुके
संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर, अकोले, शेवगाव, नेवासा, पाथर्डी, अहमदनगर
-------------
रुग्णांची व्यवस्था
कोविड सेंटर-१४५
डीसीएच-२५६
डीसीएचसी-२
----------
लसीकरण
एकूण लसीकरण केंद्र-१३४
डोस दिलेल्या व्यक्तींची संख्या-६,३१,३०५
प्राप्त डोस-६,२७,४४०
कोविशिल्ड-५,१९,५००
को-व्हक्सिन-१,०७,९४०
----------------
इतर ठळक बाबी
म्युकरमायकोसिसचे रुग्ण-१७८
ऑम्फोटेरीसोन इंजेक्शन-३५३
रेमडेसिविर उपलब्ध-६४४५
फ्लॉविपिराविर गोळ्या-५३३७५
ऑक्सिजनची टंचाई कमी झाली.