लसीचा वेग दुपटीने वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:14 AM2021-06-27T04:14:54+5:302021-06-27T04:14:54+5:30
नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला. प्रारंभी केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत होती. नंतर त्यात ...
नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला. प्रारंभी केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत होती. नंतर त्यात फ्रंटलाइन वर्कर, ६० वर्षांपुढील, ४५ वर्षांपुढील असे टप्पे वाढवण्यात आले. १ मे पासून १८ वर्षांपुढील लसीकरण सुरू झाले. मात्र आठवडाभरातच ते पुन्हा बंद झाले. नगर जिल्ह्यात पहिल्या चार लाख लसीकरणाचा टप्पा २५ एप्रिलपर्यंत उरकला. दरम्यान, एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने लसीकरणालाही मागणी वाढली. परंतु शासनाकडून लसीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नव्हता. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण केंद्रांवर नागरिकांचा गर्दी होत असे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पहाटेपासूनच रांगा लागत होत्या. त्यामुळे लस पुरवठ्यात वाढ करण्याची मागणी सातत्याने होऊ लागली.
दरम्यान, नगर जिल्ह्यात २० मे पर्यंत ६ लाख, तर १८ जूनपर्यंत ८ लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला. गेल्या दोन महिन्यांत १ लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत होता. परंतु १९ जून ते २६ जून या आठवड्याभरात ८ लाखांवरून नऊ लाखांपर्यंत लसीकरण झाले आहे. म्हणजे हा वेग दुपटीने वाढला आहे.
--------------
आता मागणी तसा पुरवठा
पूर्वी मागणी करूनही आवश्यक लस उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे लसीकरणात विस्कळीतपणा येत होता. परंतु कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता शासनाने लसीकरण उरकण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच १९ जूनपासून ३० वर्षांपुढील व २२ जूनपासून १८ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. तेव्हापासूनच लसीचा वेग वाढला आहे. हाच वेग राहिला तर जूनअखेर नगर जिल्ह्यात दहा लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण होईल.
--------------
गेल्या आठवड्यापासून लस मुबलक उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्व १३५ केंद्रांवरील लसीकरण वाढवले आहे. १८ वर्षांपुढील टप्पाही आता सुरू झाल्याने सरासरी १० ते १५ हजार लसीकरण दररोज होत आहे.
- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
--------------
आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी ४४५०० ३२६००
फ्रंटलाइन वर्कर ५८१३२ २०८८८
१८ ते ४५ वयोगट ४८८२४ ७१३४
४५ ते ६० वयोगट २६१८३६ ३४७६५०
६० वर्षांपुढील २६१८३७ ८४९१४
------------------------------------------------
६९५७९१ १९५२५३
एकूण - ८, ९१,०४४
---------
फोटो - २६लसीकरण