गतिमंद मुलास भीक मागायला लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:01 AM2018-01-30T05:01:41+5:302018-01-30T05:02:26+5:30
गतिमंद, दिव्यांग व निराधार मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागायला लावणारी टोळी नगर शहरात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परळी (जि़ बीड) येथून ६ महिन्यांपूर्वी गायब झालेला १८ वर्षांचा मतिमंद मुलगा सोमवारी शहरातील कोठला परिसरात भीक मागताना आढळल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आले.
अहमदनगर - गतिमंद, दिव्यांग व निराधार मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागायला लावणारी टोळी नगर शहरात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परळी (जि़ बीड) येथून ६ महिन्यांपूर्वी गायब झालेला १८ वर्षांचा मतिमंद मुलगा सोमवारी शहरातील कोठला परिसरात भीक मागताना आढळल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आले.
परळी येथील बरकत नगर येथून २५ जुलै २०१७ रोजी जुबेर मन्सूर शेख हा मुलगा गायब झाला होता़ या प्रकरणी त्याच्या वडिलांनी परळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ जुबेरचे शेजारी यासीन काकर नगरमध्ये कोठला परिसरात भांडेविक्रीचा व्यवसाय करतात.
त्यांना सोमवारी जुबेर आणि अन्य
एक जण व्हीलचेअरवरून भीक मागताना आढळला. त्यांनी
दोघांना तोफखाना पोलीस ठाण्यात आणले़ पोलीस रॅकेटच्या सूत्रधाराचा शोध घेत आहेत. दरम्यान, जुबेरला त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले़
अंगाला चटके
अपहरणानंतर जुबेरला आधी बिहारला नेण्यात आले. त्यानंतर, पुणे व काही दिवसांपूर्वी नगर येथे आणले होते. भीक मागण्यास नकार दिला, तर जुबेरच्या अंगाला चटके दिले जात होते़ दिवसभरात फक्त २ वडापाव दिले जात होते, असे त्याने पोलिसांना सांगितले.