अध्यात्म/माणूस तोच ज्याला आपले काम कळते/विष्णु महाराज पारनेरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 12:36 PM2020-10-15T12:36:59+5:302020-10-15T12:37:20+5:30
स्वत:च्या बाबतीत कठोर असलेच पाहिजे. जितके शरीराशी कठोर वागू तेवढे ते आपल्याला साथ देत असते. घाम घाळणे, मेहनत करणे हे पुरुषार्थाचे लक्षण आहे. ते स्वत:चे प्रमाण जोपर्यंत आहे तोपर्यंतच. मात्र ज्यावेळेस तो दुसºयायासाठी वागतो मग तो वेडेपणा होतो. 'स्व'ला प्रश्न विचारून सुधारणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.
गुरू आणि देव समजला पाहिजे आणि स्वत:ला समजून घेतले नाही तर मग मात्र काहीच नाही. जन्मभर सांगकाम्या राहण्यापेक्षा आपण स्वतंत्रपणे काम करावे हे महत्त्वाचे आहे. आपल्याला कोणी सांगकाम्या असे म्हणू नये. तुम्ही सांगाल ती कामे करतो,असे गुरूला सांगणारे खूप असतात. ज्याला स्वत:चे काम करायचे आहे तो गुरूला विचारत नाही, मात्र त्याच्याकडे गुरूचे लक्ष असते. ज्ञानी झाला की, तो अकर्मी होतो. भक्ताला वाटते की सर्व देव करणार आहे, उपासकांनाही वेगळे वाटत असते. मला काय करायचे आहे, गुरुला काय करायचे हे उपासक ओळखतो. माझ्यासाठी, गुरूसाठी, देवासाठी आणि जगाच्या कामाची यादी ज्याच्याजवळ असते त्याला शहाणपण म्हणतात. तो कदाचित ज्ञानी नसेलही पण माझ्या गुरूला हे काम केलेले आवडेल त्याच कामाची त्याला निश्चिती येते.
महात्मा गांधीजींना कुणीही स्वातंत्र्य मिळवा, असे सांगितले नव्हते तर त्यांना ते कळाले होते. या सर्व शास्त्राचा हेतू म्हणजे कामाचे स्वरूप कळावे असाच आहे. असे काम करा जे देवाला आवडेल. माणूस तोच ज्याला आपले काम कळते.
प्रत्येक कामाला बाई, पोळ्या करायला बाई, धुणे-भांड्याला बाई, मग तुम्ही काय करता.ज्ञानाला अकारण महत्त्व आहे आणि कामाचे महत्त्व कमी झाले आहे. शंभर वर्ष जगावे असे ईशावास्य उपनिषदात शिकवले आहे. देव कशासाठी पाहिजे...ध्यानासाठी. हे उत्तर शहाण्याचे कधीच नव्हते. त्यांनी जग सौंदर्यवान केले तिथे मन रमावे. हे सौंदर्य पाहून तुझे मन का तृप्त झाले नाही? असा प्रश्नही पडतो. आरे वेड्या तुला प्रेमाची जर ओळख आहे तर मग स्वत:वर प्रेम करायला का शिकत नाहीस.
स्वत:चा चेहरा मेटेंन करणे म्हणजे स्वत:वर प्रेम करणे आहे का? स्वत:वर प्रेम करणे हाच उपासनेचा मार्ग आहे. मी तोडलेले फूल वाहतो हे माझे प्रेम आहे. आपल्या हाताने जेऊ घालणे हे प्रेम आहे. या प्रेमात 'स्व'चे मरण असते. पूर्णवाद म्हणतो 'स्व' जपा. या 'स्व'ला जेवढी किंमत देता तेवढा दुसºयायाच्या 'स्व'ला द्या. डॉ. पारनेरकर महाराजांनी बाकीचे उपाशी राहू नये म्हणून अर्थशास्त्र लिहिले. भाविकताही 'स्व'ला किंमत देणारी आहे. उपासक हा सगुण साकार परमेश्वराची उपासना करणारा आहे. देव कुठलीही कृती अकारण नाही. मी सकाम आहे, माझा देवही सकाम आहे.
काय तुला प्रभू व्हावा। समाधी माझी खरे समाधान।।
मरणात का न मगती काय। समाधी दुजे नसे मरण।।
स्वत:च्या बाबतीत कठोर असलेच पाहिजे. जितके शरीराशी कठोर वागू तेवढे ते आपल्याला साथ देत असते. घाम घाळणे, मेहनत करणे हे पुरुषार्थाचे लक्षण आहे. ते स्वत:चे प्रमाण जोपर्यंत आहे तोपर्यंतच. मात्र ज्यावेळेस तो दुसºयायासाठी वागतो मग तो वेडेपणा होतो. 'स्व'ला प्रश्न विचारून सुधारणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.
काय तुला प्रभू व्हावा। लागू नर जन्म सार्थकी म्हणून।।
तरी अनुभवास कारण हे। त्याजसाठी तव जन्म।।
समाधी म्हणजे ज्ञानी. आपल्या मार्गात योग्य दिशेने चालला आहे हे कळणे. आपल्याला जगाची कल्पना नसते एवढी स्वगार्ची असते. जणू तो स्वर्गात जाऊनच आलेला आहे. जो तसे बोलतो, करतो. ज्याला कर्म स्वातंत्र्य आहे. दुदैर्वाने कधी कधी शहाण्या माणसाचा उपयोग करमणूकीसाठी गेला जातो जे दु:खदायक आहे. अकबर बादशाह आणि बिरबल याबद्दल सांगितले जाते.
काय तुला प्रभू व्हावा। येथे विटलास भोग भोगून।।
भोगावयास शिकला चतूर। तुझी इंद्रिये कलानिपूण।।
इथे भोग भोगून विटलास आणि आता स्वर्गाचे भोग भोगणार आहेस काय? तु तुझ्या इंद्रियाला शहाणे केले आहेस काय, आधी इंद्रियांना शहाणे कर. बुद्धीच्या सहाय्याने मन इंद्रियांना शहाणे करत असते. या गमकाकडे आपण लक्ष देत नाहीत. निर्णय कोणते बुद्धीचे की मनाचे हे कळाले पाहिजे. स्वत:च्या मनास, इंद्रियास ट्रेनिंग देता आले पाहिजे हे फार कमी लोक करतात. सूर्याचे तेज कळण्यासाठी गायत्रीची उपासना सांगितली जाते. आपले दोष आपल्याला कळाले पाहिजेत. उपासकाने हे मंत्र दररोज म्हटले पाहिजेत.
काय तुला प्रभू व्हावा। स्वगीर्चे विषय भोग परिपूर्ण।।
साधे जेवण येथे त्यावरी। खातोस कश्या चूर्ण।।
स्वर्गीचे विषय भोगून इथले विषय आता पचत नाहीत. त्यामुळे स्वर्गीच्या विषयाची आपण कल्पना करतो. उपासकांना ज्ञान मिळाले नाही तरी चालेल पण त्यांना याबाबतचा शहाणपणा आलेला पाहिजे. 'स्व' संपर्क आणि नंतर मोरयाचा संपर्क. परमार्थाचे हे सर्टिफिकिट कोणाकडूनही घेऊ नये. ते आपले आपल्याला मिळालेले पाहिजे. माळेतल्या प्रत्येक मण्यासारखा शहाणपणा वाढत असतो. मात्र त्यासाठी देवकृपा आणि गुरूकृपा व्हावी लागते. (संकलन-सुमती पिंगळे)