अध्यात्मिक/आशेने दीन केले सर्वांशी। आशा सर्वांशी घातक/अशोकानंद महाराज कर्डिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:57 PM2020-08-25T12:57:41+5:302020-08-25T13:04:11+5:30

आशा ही परमं दु:खं नैराश्यं परमं सुखम् । यथा संछिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिंगला ॥ (श्रीमद्भागवत ११/८/४४) मित्रांनो विचार करा. एका वेश्येने अंतर्मुख होऊन विचार केला तर तिचा सुद्धा उद्धार झाला. लोक म्हणतात की माणसाचे जीवन आशेवर आहे. पण ते संतांच्या दृष्टीने चुकीचे आहे.

Spiritually / hopefully humbled Savarshi. Hope is deadly to everyone | अध्यात्मिक/आशेने दीन केले सर्वांशी। आशा सर्वांशी घातक/अशोकानंद महाराज कर्डिले

अध्यात्मिक/आशेने दीन केले सर्वांशी। आशा सर्वांशी घातक/अशोकानंद महाराज कर्डिले


भज गोविन्दम भाग -१४
------------------
दिनमपि रजनी सायं प्रात: शिशिरवसन्तौ पुनरायात:।
काल: क्रीडति गच्छत्यायु: तदपि न मुञ्चति आशावायु-१४

-----------------
ज्योतिषशास्त्रानुसार कलीयुगामध्ये ७ महान व्यक्तींनी संवत सुरु केले आहेत. युधिष्ठर, विक्रम, शालिवाहन, विजयाभिनन्दन, नागार्जुन, कल्की, छत्रपती श्री शिवाजी महाराज हे ते सात व्यक्ती आहेत. या आगोदर सप्त ऋषींनी संवत सुरु केले होते. त्यानुसारच नंतरच्या लोकांनी अपडेट केले आहेत. कालगणनेमध्ये क्रमश: प्रहर, दिवस, रात्र, पक्ष,आयन, संवत्सर, दिव्य वर्ष,मन्वंतर, युग,कल्प आणि ब्रह्माची कालगणना यानंतर केली जाते. या चक्रीय पद्धतीने हिंदूंनी आपली कालगणना विभाजित केली आहे. जसे की, कल्प, मन्वंतर, युग,सत्ययुग कृत), त्रेता, द्वापार,कलियुग ) ही कालगणना चक्रीय पद्धतीने पुन्हा: पुन्हा: येत असते. चक्रीय याचा अर्थ, सूर्योदय व सूर्यास्त व पुन्हा: सूर्योदय होणे एवढाच नाही तर काल हा चक्रीय नसून घटनाक्रम चक्रीय आहे, याची पुनरवृत्ती होते. पुनरावृत्तीमध्ये पण घटनाक्रम पहिल्यासारखा नसतो.


याच चक्रीय कालमानाप्रमाणे ब्रह्माचे आयुमार्नाच्या दुसऱ्या खंडामध्ये श्वेत वाराह खंडामध्ये वैवस्वत मन्वंतर व अठ्ठावीसावे कलियुग सुरु आहे. या कलियुगाच्या संपतीनंतर पुन्हा: सत्ययुग सुरु होणार. हिंदूंच्या कालगणनेनुसार पृथ्वीवर सजीवांची सुरुवात अंदाजे २०० कोटी वषार्पूर्वी सुरु झाली असावी. ऋतूचक्र अनादी काळापासून सुरूच आहे. त्याला नावे फक्त नंतर दिली गेली.


ऋतूचक्र याप्रमाणे आहे. वसंत -चैत्र ते वैशाख (वैदिक मधू आणि माधव)मार्च ते एप्रिल,
ग्रीष्म -ज्येष्ठ ते आषाढ (वैदिक शुक्र आणि शुचि)मे ते जून,
वर्षा- श्रावण ते भाद्रपद (वैदिक नभ: आणि नभस्य)जुलै ते सप्टेंबर
शरद -आश्विन ते कार्तिक (वैदिक इष आणि उर्ज) आॅक्टोंबर ते नोव्हेंबर
हेमंत -मार्गशीर्ष ते पौष (वैदिक सह:- सहस्य) डिसेंबर ते १५ जानेवारी
शिशिर -माघ ते फाल्गुन (वैदिक तप: आणि तपस्य) १६ जनवरी ते फेब्रुवारी.

वरीलप्रमाणे साधारणपणे हिंदू धमार्ची कालगणना केली जाते. श्री शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात की, दिवस रात्र येतात जातात. शिशिर, वसंत आदी ऋतू येतात व जातात. पण जीवाची अशा काही सुटत नाही.


जनक राजाच्या राज्यामध्ये एक पिंगला नावाची वेश्या होती. एक दिवस ती तिच्याकडे येणाºया धनिक पुरुषांची रात्रभर वाट बघत राहिली. पण त्या रात्री तिच्याकडे कोणीही ढुंकून देखील बघितले नाही. तिला खूप पश्चाताप झाला आणि नेमके त्याच वेळी श्री अवधूत म्हणजे श्री दत्तात्रयांचे दर्शन झाले. तिच्या लक्षात आले की भोगामध्ये सुख नाही तर त्यागातच सुख आहे.


आशा ही परमं दु:खं नैराश्यं परमं सुखम् । यथा संछिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिंगला ॥ (श्रीमद्भागवत ११/८/४४) मित्रांनो विचार करा. एका वेश्येने अंतर्मुख होऊन विचार केला तर तिचा सुद्धा उद्धार झाला. लोक म्हणतात की माणसाचे जीवन आशेवर आहे. पण ते संतांच्या दृष्टीने चुकीचे आहे.

संत म्हणतात,
सर्व सुखाचिया आशा जन्म गेला । क्षण एक मुक्ति यत्न नाहीं केला.
हिंडतां दिशा शीण पावला । माया वेष्टिला जीव माझा ॥१॥
माझें स्वहित नेणती कोणी । कांहींच न करिती मजवांचूनि ।
सज्जन तंव सुखाची मांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥धृ॥तु. म.


सुखाच्या आशेत जन्म गेला की सुखात गेला? हे काहीच कळत नाही. खरे तर सुखाच्या आशेत जन्म गेला पण सुख नाही मिळाले. संत मुक्ताबाई सुद्धा ताटीच्या अभंगात म्हणतात, आशा दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा.


श्री संत नाथ बाबा म्हणतात. आशा उपजली भगवंतासी। नीच वामनत्व आले त्यासी। आशेने दीन केले सवार्शी। आशा सर्वांशी घातक॥ भगवंताला बालीराजाकडून त्रिपाद भूमी दान मागण्याची आशा निर्माण झाली. त्याकरिता त्याला लहान व्हावे लागले. या आशेने सर्वांना दीन केले आहे. भगवान आद्य श्रीशंकराचार्य स्वामी महाराज हेच सांगतत की, आयुष्य क्षणाक्षणाने निघून जात आहे. तरीही या मानवाला आशेतून सुटका होत नाही. आशा व्याली दु:खाते आशेने दु:खाला जन्म दिला म्हणून वैराग्यच सुखाला कारण आहे हेच सत्य आहे.

-भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागावाताश्रम , चिचोंडी पाटील ता. अहमदनगर .
मो. ९४२२२२०६०३

Web Title: Spiritually / hopefully humbled Savarshi. Hope is deadly to everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.