पेमगिरी येथील महाकाय वटवृक्ष संगमनेर तालुक्याचे वैभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:15 AM2021-06-25T04:15:57+5:302021-06-25T04:15:57+5:30
थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले दंडकारण्य अभियान आणि संगमनेर नगर परिषदेचे माझी वसुंधरा अभियान या ...
थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले दंडकारण्य अभियान आणि संगमनेर नगर परिषदेचे माझी वसुंधरा अभियान या दोन्ही अभियानाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. २४) संगमनेर शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये वट पौर्णिमेनिमित्त वटवृक्षांचे रोपण करत पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा तांबे बोलत होत्या. सुनंदा दिघे, स्मिता बांगर, निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, सौदामिनी कान्होरे, राधाबाई गुंजाळ, मुक्ताबाई पवार, मनीषा उकिरडे, कौठे कमळेश्वरच्या सरपंच मीरा भडांगे, सोनाली जोंधळे, सुनीता मुसळे, गायत्री जोंधळे, रूपाली औटी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, नगरसेवक गजेंद्र अभंग, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर, विलास हासे, बाळासाहेब पवार आदी यावेळी उपस्थित होते.
नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, वट पौर्णिमेला भारतीय परंपरेत मोठे स्थान असून, यानिमित्त देव वृक्षांची आपण पूजा करतो. हे वृक्ष सर्वाधिक ऑक्सिजन देणारे आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सर्वांना प्राणवायूची मोठी उणीव भासली. ऑक्सिजनची कमतरता भासू नये, याकरिता सर्वांनी वृक्षांचे रोपण, संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्लोबल वाॅर्मिंगची वाढती समस्या कमी करण्यासाठी सर्वांनी वृक्ष संवर्धन करून हिरवाई निर्माण करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
..........
फोटो नेम : २४दंडकारण्य,
: वट पौर्णिमेनिमित्त वटवृक्षांचे रोपण करत पूजन करण्यात आले.