नेवासा फाटा येथे योग प्रशिक्षण कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 02:52 PM2019-06-20T14:52:26+5:302019-06-20T14:53:13+5:30
आतंरराष्ट्रीय जागतिक योग दिनाच्या पार्श्वभुमीवर नेवासा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती संकुलात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय योग प्रशिक्षण कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कुकाणा : आतंरराष्ट्रीय जागतिक योग दिनाच्या पार्श्वभुमीवर नेवासा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती संकुलात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय योग प्रशिक्षण कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी प्रार्थना घेऊन योगासन आणि प्राणायमची माहिती जिल्हा पतजंली योग समितीचे जिल्हा प्रभारी दिगंबर रिंधे यांनी दिली तर सह प्रभारी काकासाहेब फोलाणे, योग प्रशिक्षक पांडुरंग बरे, रविंद्र सरवदे, सुनिल पंडित, शरद तांबे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविली.
नेवासा पंचायत समिती शालेय पोषण आहार विभागाच्या प्रमुख हेमलता गलांडे, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी डी.टी. तळपे, शंकर गाले, विषयतज्ञ समीर शेख, केंद्र प्रमुख नवनाथ फाटके, के. बी. जगधने, दौलतराव तुंवर, रंजनी पंडोरे आदि मान्यवर व्यासपिठावर होते. यावेळी योगगुरू दिगंबर रिंधे यांनी मयुरासन, शिरशासन, ताडासन, वज्रासन, सेतुबंदासन या सह सर्व प्राणायम घेवुन याबाबतचे फायदे सांगितले. यावेळी तालुक्यातील केंद्र प्रमुख,माध्यमिक शाळेतील क्रीडाशिक्षक व जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. या योग प्रशिक्षण कार्यशाळेस शिक्षकांकडुन चांगला प्रतिसाद मिळाला. अध्यापक सतीष भोसले यांनी आभार मानले.